Sunday, September 8, 2024
Homeब्रेकिंग न्यूजविधानपरिषदेच्या निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग' करणाऱ्यांमध्ये काँग्रेसच्या 'या' आमदारांच्या नावाची सर्वाधिक चर्चा

विधानपरिषदेच्या निवडणुकीत ‘क्रॉस व्होटिंग’ करणाऱ्यांमध्ये काँग्रेसच्या ‘या’ आमदारांच्या नावाची सर्वाधिक चर्चा

मुंबई | Mumbai

विधानपरिषदेच्या (Vidhan Parishad) ११ जागांचा निकाल दोन दिवसांपूर्वी जाहीर झाला. यात महायुतीचे (Mahayuti) ९ तर महाविकास आघाडीचे २ उमेदवार विजयी झाले आहेत. मात्र, विधानपरिषदेच्या या निवडणुकीत काँग्रेसच्या सात ते आठ आमदारांनी क्रॉस व्होटिंग (Cross Voting) केल्याचा दावा करण्यात येत आहे. तसेच यासंदर्भातील अहवाल महाराष्ट्र काँग्रेसने शुक्रवारी रात्रीच दिल्लीला (Delhi) हायकमांडकडे पाठवला असून पक्षविरोधी कृती केल्याबद्दल कारवाई करण्याची शिफारस या अहवालात करण्यात आली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Hiraman Khoskar : “मी पक्षाशी कुठलीही गद्दारी केली नाही, माझी बदनामी थांबवा” – आमदार खोसकर

त्यानंतर आता या अहवालात महाराष्ट्र काँग्रेसने (Maharashtra Congress) पाठविलेल्या काही आमदारांची नावे समोर आली आहेत. त्यानुसार यात आमदार झिशान सिद्दीकी, सुलभा खोडके, जितेश अंतापूरकर, शिरीष चौधरी, हिरामण खोसकर आणि मोहन हिंबर्डे यांच्या नावांचा समावेश असल्याचे बोलले जात आहे. मात्र, क्रॉस व्होटिंग केलेले ते आमदार (MLA) कोण हे काँग्रेसकडून कारवाई करण्यात आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

हे देखील वाचा : आगामी विधानसभा निवडणुकीत मविआ महायुतीवर पडणार भारी

दरम्यान, महाविकास आघाडीकडे (Mahavikas Aaghadi) एकूण ७२ मते असताना पहिल्या पसंतीत महाविकास आघाडीच्या तीन उमेदवारांना (Candidate) केवळ ५५ मते मिळाली आहेत. त्यामुळे एकूण १७ मते फुटल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. यात कॉंग्रेसह इतर छोट्या पक्षांच्या आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या (Thackeray Shivsena) दोन आमदारांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे.

हे देखील वाचा : Nashik Accident News : कसारा घाटात कंटेनरची सहा ते सात वाहनांना धडक

हिरामण खोसकर यांनी दिले स्पष्टीकरण

विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदारांमध्ये कॉंग्रेसचे इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचे आमदार हिरामण खोसकर (MLA Hiraman Khoskar) यांचाही समावेश असल्याच्या बातम्या माध्यमांतून समोर येत आहेत. त्यानंतर या सर्व प्रकरणावर आमदार खोसकर यांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध करत स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, “गेल्या दोन दिवसांपासून माध्यमांच्याद्वारे सुरु असलेली माझी बदनामी वरिष्ठांनी या प्रकरणाची दखल घेऊन थांबवली पाहिजे. मी पक्षाशी कुठलीही गद्दारी केलेली नाही. कॉंग्रेसच्या कोणत्या आमदाराने कुठल्या उमेदवाराला मतदान करायचे हे ठरले होते. त्यानुसार मी पहिल्या पसंतीचे मतं मिलिंद नार्वेकर,दुसऱ्या पसंतीचे जयंत पाटील आणि तिसऱ्या पसंतीचे मतं प्रज्ञा सातव यांना दिले. त्यामुळे माझे मतं फुटले नसून मी व्यवस्थित मतदान केले आहे. माझी नाहक बदनामी सुरु असून ती चुकीची आहे.त्यामुळे पाहिजे तर पक्षातून माझी हकालपट्टी करा पंरतु, त्याआधी माझे मतदान चेक करून बघा”, असे आमदार खोसकर यांनी म्हटले आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या