Thursday, February 5, 2026
Homeब्रेकिंग न्यूजShivsena Thackeray Group: "उंची पेंग्विनसारखी, चाल बदकासारखी, आणि आवाज…"; ठाकरे गटाची नितेश...

Shivsena Thackeray Group: “उंची पेंग्विनसारखी, चाल बदकासारखी, आणि आवाज…”; ठाकरे गटाची नितेश राणेंवर बोचरी टीका

मुंबई | Mumbai
सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणात कोणताही घातपात नसून ती आत्महत्याच होती, असे प्रतिज्ञापत्र पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयात सादर केल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या अहवालावर आदित्य ठाकरे यांनी भाष्य करण्यास नकार दिला. मात्र, भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी या मुद्द्यावर सातत्याने आरोप केले. त्याचवेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नितेश राणेंवर जोरदार टीका केली. यावेळी संजय राऊत यांनी नितेश राणेंनी नाक घासून माफी मागावी, अशी मागणी केली.

याच मुद्द्यावरून काल भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. विशेष म्हणजे नितेश राणेंनी याबाबत माहिती दिल्यानंतर आदित्य ठाकरे आणि नितेश राणे विधानभवन सभागृहाबाहेर एकमेकांसमोर आल्याचे पाहायला मिळालं होते, त्यावेळी नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंची मिमिक्री केली. नितेश राणे लहान आवाजात “ए चला.. चला…” असे म्हणत आदित्य ठाकरेंची नक्कल केली. या मिमिक्रीवरून आता सोशल मीडियावर युद्ध पाहायला मिळत आहे. आता यावरुन ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी नितेश राणेंवर बोचरी टीका केली आहे.

- Advertisement -

ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी नुकतेच ट्वीटरवर एक ट्वीट केले आहे. उंची पेंग्विनसारखी, चाल बदकासारखी, आणि आवाज कोंबडीसारखा किकीक करणारा… असा हा ‘दिशाहीन’ जुहूचा निब्बर — ओळखा पाहू कोण? अशा शब्दात ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी मंत्री नितेश राणेंवर बोचरी टीका केली आहे.

YouTube video player

त्यासोबतच अखिल चित्रे यांनी एक ट्वीटही केले आहे. “दिशा सालियन प्रकरणात आलेल्या SIT अहवालानंतर जुहूचा निब्बर तोंडावर पडला आहे. शेवटी सत्याचाच विजय होणार, आदित्य साहेबांवर चिखल उडवणाऱ्याचं तोंड असंच रंगत राहील, तुम्ही कट कारस्थान रचत रहा, आदित्य ठाकरे महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करत राहतील”, असे अखिल चित्रे म्हणाले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Soybean Rate : राहाता बाजार समितीत सोयाबीनची आवक; वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) बुधवारी सोयाबीनला (Soybeans) 5500 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला. सोयाबीनच्या 37 क्विंटलची आवक झाली. सोयाबीनला...