Saturday, March 29, 2025
Homeमनोरंजनसुशांतसोबत दिशा सालियनच्या मृत्यूचा तपास सुरु

सुशांतसोबत दिशा सालियनच्या मृत्यूचा तपास सुरु

मुंबई | Mumbai –

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्याप्रकरणाच्या तपासासोबत आता एकेकाळी सुशांतची मॅनेजर म्हणून काम पाहणार्‍या

- Advertisement -

दिशा सालियन हिच्याही मृत्यूचा तपास सीबीआयने हाती घेतला आहे. सुशांतने आत्महत्या करण्याच्या काही दिवसांपूर्वीच दिशाने इमारतीवरुन उडी मारून जीवन संपवले होते. दरम्यान, दिशाच्या मृत्यूचा तपास करतेवेळी सर्वप्रथम सीबीआयने Cornerstones Company चा मालक असणार्‍या बंटी सचदेव याला चौकशीसाठी डीआरडीओ गेस्ट हाऊस येथे बोलावले आहे. बंटी सचदेव हा अभिनेता सोहेल खान याच्या पत्नीचा भाऊ आहे.

Cornerstones Company ही एक सेलिब्रिटी मॅनेजमेंट कंपनी आहे. विराट कोहलीसारख्या आघाडीच्या क्रिकेटपटूपासून अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींचं पीआर संबंधित काम या कंपनीकडून पाहिले जात आहे. दिशा याच कंपनीत काम करत होती. मृत्यूपूर्वी ती सुशांतच्या एका चित्रपटाच्या पीआरचे कामही पाहत असल्याची माहिती समोर आली होती.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणीच्या तपासाला जोडूनच सीबीआय दिशाच्या मृत्यूची चौकशी करत आहे. काही दिवसांपूर्वीच दिशाच्या आत्महत्या प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली होती.

दिशाचा फोन तिच्या मृत्यूनंतरही सुरु होता. एवढेच नाही तर, तिचा फोन फॉरेन्सिक टीमला तपासणीकरता पाठवण्यातही आला नव्हता. मिळालेल्या माहितीनुसार 17 जूनपर्यंत दिशाचा फोन सुरू होता. तिच्या आत्महत्येची तपासणी देखील केली नव्हती. दिशाचा ऑटोप्सी रिपोर्ट देखील दोन दिवसानंतर करण्यात आला होता. आता सीबीआयला या प्रश्नांची उत्तरे

मिळणार का आणि त्यातून कोणती माहिती समोर येणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik : ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

0
नाशिकरोड | प्रतिनिधी Nashikroad नाशिक-पुणे महामार्गावर असलेल्या गांधीनगर जवळील विजय ममता चित्रपटगृहाजवळ ट्रॅक्टरची वाहतूक करणाऱ्या ट्रकची एका तरुणाला जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात एक युवक...