Thursday, May 7, 2026
Homeक्राईमबडतर्फ पोलिसाचे कारागृहातून महिलेला धमकीचे पत्र

बडतर्फ पोलिसाचे कारागृहातून महिलेला धमकीचे पत्र

खूनाच्या गुन्ह्याचे तपास अधिकारी व साक्षीदाराला सोडणार नसल्याची धमकी

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

खूनाच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या बडतर्फ पोलिसाने याच गुन्ह्यातील साक्षीदार महिलेला पत्राव्दारे धमकी दिल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सदरचा पत्रव्यवहार हा जिल्हा कारागृहातून झाला असल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण बबन कोळपे (रा. विळद, ता. अहिल्यानगर) असे गुन्हा दाखल झालेल्या त्या बडतर्फ पोलिसाचे नाव आहे. 34 वर्षीय फिर्यादी महिला शहरातील काटवन खंडोबा परिसरातील साई कॉलनीत राहतात.

- Advertisement -

तर किरण कोळपे हा जिल्हा पोलीस दलात नोकरीला होता. मात्र त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्ष्यात घेता त्याला पोलीस खात्यातून बडतर्फ केले आहे. शहरातील व्यापारी दीपक परदेशी यांच्या खून प्रकरणी किरण कोळपे हा अटकेत आहे. घटना 6 सप्टेंबर रोजी घडली असून गुन्हा मंगळवारी (9 सप्टेंबर) रात्री दाखल झाला आहे. महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, त्या तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा रजि. नं. 284/2025 मध्ये साक्षीदार आहे. त्यामुळे या गुन्ह्यातील संशयित आरोपी कोळपे याने त्यांना पत्राव्दारे धमकी दिल्याचे स्पष्ट झाले आहे. मी पोलीस खात्यात 15 वर्षे नोकरी केलेली आहे. मी चार्जशीट (दोषारोपपत्र) पाहिले असून तपासी अंमलदार व साक्षीदार यांना सोडणार नाही, असा मजकूर संशयित आरोपीने लिहिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

दरम्यान, फिर्यादीने किरण कोळपे विरोधात पूर्वीही अनेक वेळा पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या असून, धमकीचे पत्र जिल्हा कारागृह, अहिल्यानगर येथून पाठविण्यात आले असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख करीत आहेत.

ताज्या बातम्या

Shrirampur : निर्मळपिंपरी बेकायदा गर्भलिंग तपासणी प्रकरणी श्रीरामपुरातील डॉ. कुटेसह दोन...

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निर्मळपिंपरी परिसरात सुरू असलेल्या बेकायदा गर्भलिंग निदानाच्या गंभीर आणि समाजघातक रॅकेटवर पोलिसांनी मोठा घाव घालत, श्रीरामपूर शहरातील प्रतिष्ठीत...