नाशिक | प्रतिनिधी | Nashik
सर्वत्र लाल कांद्याला मातीमोल भाव मिळाल्याने केंद्र सरकारने (Central Government) नाफेडमार्फत (NAFED) कधी नव्हे ती लाल कांद्याची (Onion) अल्प खरेदी केली. यास आता तब्बल चार महिने उलटून गेले तरीही शेतकऱ्यांना कांदा विक्रीचे पैसे मिळालेले नाहीत. फार्मर प्रोड्युसर कंपन्याही पैशासाठी सरकारवरच अवलंबून आहेत. शेतकऱ्यांना पैसे मिळत नसल्याने तीव्र नाराजी दिसून येत आहे…
भारतातून बँकॉकला जाता येणार बायरोड; कधीपासून सुरु होणार महामार्ग?
मार्च महिन्यात नाफेडने केवळ १८ कोटी रुपयांचा कांदा खरेदी केलेला आहे. लाल कांद्याची खरेदी फार्मर प्रोड्युसर कंपन्यांमार्फत केली होती.ही खरेदी बुडत्याला काडीचा आधार अशीच ठरली. या खरेदीने खुल्या बाजारात कांद्याचे भावही वाढले नाहीत. ही खरेदी खुल्या बाजारात होणे आवश्यक असताना संबंधित खरेदीदारांनी आपल्याच जवळच्या लोकांचा तसेच कमी भावात हा कांदा खरेदी केला.
नाफेडच्या खरेदीबाबत तक्रारी असल्याने शेतकरी समाधानी नाही,अशी परिस्थिती आहे.या खरेदीने बाजारात भावही वाढत नाही. त्यात चार चार महिने कांदा विक्रीचे पैसे मिळत नाही. बाजार समितीत चोवीस तासांच्या आत शेतमाल विक्री झाल्यानंतर पैसे देणे बंधनकारक आहे. हाच नियम नाफेडला का लागु होत नाही, असा प्रश्न आता शेतकरी उपस्थित करत आहेत. सरकारने आता शेतकऱ्यांना व्याजासकट पैसे द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
मान्सूनची वाट बघावीच लागणार