Thursday, August 27, 2026
Homeब्रेकिंग न्यूजCrime : मित्रांमधला वाद विकोपाला; २७ वर्षीय युवकाची धारदार शस्त्राने वार करून...

Crime : मित्रांमधला वाद विकोपाला; २७ वर्षीय युवकाची धारदार शस्त्राने वार करून हत्या

सापुतारा | प्रतिनिधी Saputara

- Advertisement -

डांग जिल्ह्यातील प्रसिद्ध गिरिस्थळ सापुतारा येथे बुधवारी मध्यरात्री मित्रांमधील वादातून २७ वर्षीय युवकाची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीला सापुतारा पोलिसांनी ताब्यात घेतले असून, अन्य संशयितांची चौकशी सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील सहा मित्र सापुतारा येथे फिरण्यासाठी आले होते. यातील चार मित्र आधी सापुतारा येथे आले होते, तर त्यानंतर आणखी दोन मित्र त्यांच्यात सहभागी झाले.

बुधवारी रात्री सर्व मित्र सापुतारा येथील संग्रहालयाजवळील बँक ऑफ बडोदा (BOB) ATM परिसरात नाश्ता करण्यासाठी बसले होते. यावेळी गणेशोत्सवासाठी वर्गणी देण्याच्या मुद्द्यावरून तसेच मागील वर्षी गणेश विसर्जनाच्या वेळी झालेल्या जुन्या वादावरून त्यांच्यात वाद सुरू झाला.

हा वाद वाढत जाऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी संतापलेल्या एका युवकाने २७ वर्षीय हेमंत विलास सूर्यवंशी याच्यावर धारदार शस्त्राने पोटावर गंभीर वार केले. या हल्ल्यात हेमंत रक्तबंबाळ होऊन खाली कोसळला.

घटनेनंतर हेमंत याला त्याच्या दोन मित्रांनी तातडीने मोटारसायकलवरून पुढील उपचारांसाठी महाराष्ट्रातील वणी येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान गंभीर जखमी झालेल्या हेमंत सूर्यवंशी याचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच सापुतारा पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि तपास सुरू केला. डांगच्या पोलीस अधीक्षक पूजा यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सापुतारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जे. के. बारिया आणि त्यांच्या पथकाने तत्काळ कारवाई करत हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कृणाल किरण परदेशी याला ताब्यात घेतले.

दरम्यान, घटनास्थळी उपस्थित असलेल्या अन्य चार संशयित युवकांचीही पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. सापुतारा पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला असून, गुन्ह्यात वापरण्यात आलेले धारदार शस्त्र जप्त करण्यासह हत्येमागील नेमके कारण शोधण्यासाठी पुढील सखोल तपास सुरू आहे.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : तरुणाचा गळा आवळून खून

0
ओझर | प्रतिनिधी Ozar ओझर शहरातील मध्यवर्ती असलेल्या संभाजी चौक परिसरात एका तरुणाची गळा आवळून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली. भरवस्तीत घडलेल्या...