धुळे। प्रतिनिधी dhule
साक्री शहरातील सुभाष चौकात दोन लहान मुलांच्या भांडणातून मोठ्यांमध्ये तुफान राडा झाला. मिरचीपुडसह लोखंडी रॉड, काठ्या, चाकुचा यात सर्रासपणे वापर करण्यात आल्याने १७ जण जखमी झाले. याप्रकरणी दोन्ही गटातील ३० जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
Video नंदुरबार : शिवपुराण कथाकार प्रदीप मिश्रा यांचे असे झाले स्वागत
साक्री शहरात काल दि.२१ एप्रिल रोजी यश मार्गे व निखिल जाधव या लहान मुलांमध्ये भांडण झाले. त्यानंतर मात्र या भांडणात मोठ्यांनी सहभाग घेतला. मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास सुभाष चौकात दोन गट समोरा-समोर आले. मिरची पुड एकमेंकावर फेकुन हातातील लोखंडी रॉड, लाकडी काठया, तिक्ष्ण चाकुने एकमेकांना जिवे ठार मारण्याचा उद्देशाने मारहाण करून गणेश अरुण जगताप, भटु रविंद्र मार्गे, रविंद्र नथ्थु मार्गे, अशोक नथ्थु मार्गे, यश नथ्थु मार्गे, गोल्डन नथ्थु मार्गे, रंजना गणेश जगताप, सुनिता रविंद्र मार्गे, सिमा अशोक मार्गे, संजीवनी गोल्डन मार्गे, ममता नथ्थु मार्गे, ताराबाई नथ्थु मार्गे, सुनिता मनोज शिंदे, महेश दीपक शिंदे, मनोज उत्तम शिंदे, विरेंद्र मनोज शिंदे, राहुल दीपक शिंदे यांना जिवे ठार मारण्याचा उद्देशाने मारहाण करुन जखमी केले.
Video नंदुरबार : शिवपुराण कथाकार प्रदीप मिश्रा यांचे असे झाले स्वागत
तर इतरांनी हाताबुक्यानी मारहाण करीत शिवीगाळ करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. याबाबत पोहेकाँ दिलीप कांबळे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, रविंद्र नथ्थु मार्गे, अशोक नथ्थु मार्गे, भटु रविंद्र मार्गे, यश रविंद्र मार्गे, गोल्डन नथ्थु मार्गे, गणेश अरुण जगताप, रंजना गणेश जगताप, सुनिता नथ्थु मार्गे, सिमा अशोक मार्गे, संजवणी गोल्डन मार्गे, ममता नथ्थु मार्गे, ताराबाई नथ्थु मार्गे सर्व (रा.भाजीपाला मार्केट, मेन बाजारपेठ, साक्री), तर दुसर्या गटाचे राहुल दीपक शिंदे, विरेंद्र मनोज शिंदे, दीपक उत्तम शिंदे, मनोज उत्तम शिंदे, संगीता दीपक शिंदे, सोनी मनोज शिंदे, भरत गौतम जगताप, राणी मनोज शिंदे, निकीता मनोज शिंदे, मुकेश रविंद्र पवार, मिलींद रविंद्र पवार, कलीबाई उत्तम शिंदे, महेश दीपक शिंदे, निखील राजेंद्र जाधव, गौरव ऊर्फ झिंगु बाबुराव जगताप, रुपेश रविंद्र पवार, मिनाबाई रविंद्र पवार, दिनेश ओंकार जाधव सर्व (रा.लोकमान्य नगर, साक्री) यांच्याविरोधात भादंवि कलम ३०७, १६०, १४३, १४७, १४८, १४९, ३२४, ३२३, ५०४, ५०६ सह महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (क) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख हे करीत आहेत.
Video नंदुरबार : शिवपुराण कथाकार प्रदीप मिश्रा यांचे असे झाले स्वागत