Friday, April 25, 2025
Homeक्राईमजुन्या वादातून घरासमोरील कार पेटवली

जुन्या वादातून घरासमोरील कार पेटवली

पाथर्डी पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

जुन्या वादातून घरासमोर लावलेली ईर्टीगा कार पेट्रोल टाकून पेटवून देऊन महिलांना शिवीगाळ करण्यात आली. ही घटना सोमठाणे येथे शुक्रवारी (20 डिसेंबर) रात्री दहा वाजता घडली. याबाबत संगीता काकडे यांचा फिर्यादीवरून पाच जणांविरोधात पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगीता विष्णू काकडे यांचा मुलगा रामेश्वर काकडे व गावातील तरुण संतोष माणिक खवले यांच्यात जुना वाद होता.त्त्यामुळे गाडी जाळल्याचा प्रकार घडला आहे. शुक्रवारी रात्री दहा वाजता संतोष खवले, अमोल खवले, राहुल खवले व दोन अनोळखींनी काकडे यांच्या घरी येऊन रामेश्वर कुठे असल्याचे विचारले. त्यावेळी रामेश्वर हा बाहेर गेला असल्याचे त्याच्या आईने सांगितले.

- Advertisement -

यावेळी संतोष खवले ‘तो गावात लई शहाणा झाला आहे’ असे म्हणाला व रामेश्वर काकडे यांच्या आई व पत्नीस शिवीगाळ केली. खवलेच्या साथीदारांनी काकडे यांच्या घरासमोर असलेल्या शेडमधील ईर्टीगा कारच्या (एमएच 14, जीएच 5885) काचा फोडल्या. त्यानंतर गाडीवर पेट्रोल टाकून पेटवून दिली. यामध्ये गाडी पूर्णपणे जळून खाक झाली. संशयित आरोपींनी पोलिसांत गुन्हा दाखल केला तर तुमच्या विरुद्ध खोटी तक्रार देऊ अशी धमकी दिली. संगीता काकडे यांच्या फिर्यादीवरून शनिवारी पहाटे तीन वाजता संतोष खवले, अमोल खवले, राहुल खवले व दोन अनोळखींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील संशयित आरोपी फरार असून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेण्याची मागणी काकडे यांनी केली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी अण्णा पवार करत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...