Thursday, May 8, 2025
HomeनगरCrime News : मागील भांडणाच्या वादातून ठेकेदारावर कोयत्याने हल्ला

Crime News : मागील भांडणाच्या वादातून ठेकेदारावर कोयत्याने हल्ला

बोल्हेगाव उपनगरातील घटना

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

बोल्हेगाव उपनगरातील भारत बेकरीजवळ 4 मे च्या रात्री साडेआठच्या सुमारास एका ठेकेदारावर चार जणांच्या टोळक्याने कोयत्याने हल्ला केला. पवन रमेश शिंदे (वय 25, रा. गांधीनगर, बोल्हेगाव) असे जखमी ठेकेदाराचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यश शिरसाठ, सुलेमान शेख, राहुल साबळे आणि रावण (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी यांनी एकत्र येऊन पवन शिंदे व त्यांचा मित्र शुभम कळसगर (रा. गांधीनगर) यांच्यावर लाथाबुक्यांनी मारहाण केली.

- Advertisement -

मागील भांडणाचा राग मनात धरून त्यांनी मारहाण केली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. पवन शिंदे त्यांच्या दुचाकीवरून मित्रासोबत फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडले असता, भारत बेकरी जवळ संशयित आरोपींनी रस्त्यात अडवून अचानक हल्ला केला. यश शिरसाठ आणि सुलेमान शेख या दोघांनी कोयत्याने हल्ला करून पवनच्या डाव्या हातावर गंभीर जखम केली. पवन याला तात्काळ खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास पोलीस अंमलदार रमेश शिंदे करीत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

भिंगार उपनगरात दोन ठिकाणी घरफोडी

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन ठिकाणी घरफोडी झाल्याची घटना समोर आली आहे. दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये चोरट्यांनी बंद घरे लक्ष करून रोख...