नाशिक । प्रतिनिधी Nashik
शिवसेनेच्या माध्यमातून शहरभरात जनसामान्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून शिवसेनेने घेतलेल्या लोककल्याणकारी योजनांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी युवकांनी सज्ज होण्याचे आवाहन पालकमंत्री दादा भुसे यांनी केले.संपूर्ण नाशिक शहरातील प्रमुख चौक पूर्णपणे भगवे करुन नाशिककरांना शिवसेनेच्या वर्धापन दिनाची नोंद करण्यात आली. एक दिवसापुरता मर्यादित कार्यकम न करता हा संपूर्ण महिना भगवा महिना म्हणून साजरा करण्याचा निर्धार यावेळी कण्यात आला.
त्यात प्रामुख्याने 10 वी व 12 उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ, क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी करणार्या क्रीडापटूंचा सत्कार समारंभ, सरकार आपल्या दारी अंतर्गत योजनांची जत्रा, यात सरकारी योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचवून लाभार्थींना लाभ मिळवून देणे, ज्येष्ठ नागरिक वैद्यकीय तपासणी शिबिर, शिवसेना, युवासेना शाखा उद्घाटनांचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे सोमवार 19 जून शिवसेना वर्धापन दिनानिमित्त हजारोंच्या संख्येने शिवसैनिक गोरेगाव, मुंबई येथील आयोजित कार्यक्रमासाठी रवाना होणार असल्याचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी सांगितले.
शिवसेना मुख्यालयात झालेल्या बैठकीत नाशिक शहरातील विविध महिला बचत गटांसहित डॉक्टर्स, विविध सामाजिक संस्थेच्या, संघटनांच्या पदाधिकार्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. बचत गट महिलांचे देखील प्रवेश झाले. याप्रसंगी सह संपर्क प्रमुख राजू लवटे, शिवसेना जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, भाऊलाल तांबडे, अनिल ढिकले, संजय दुसाने, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे, राजाभाऊ सोनवणे, उप जिल्हाप्रमुख शाम साबळे, शशिकांत कोठुळे, दिगंबर मोगरे, शिवाजी भोर, प्रमोद लासुरे, अमोल सूर्यवंशी, विधानसभा प्रमुख बाबुराव आढाव, प्रताप मेहरोलिया, रोषण शिंदे, दीपक मौले, सनी रोकडे आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.