Tuesday, July 16, 2024
Homeनाशिकइगतपुरीतील कोविड सेंटरला १० ऑक्सिजन सिलेंडरचे वाटप

इगतपुरीतील कोविड सेंटरला १० ऑक्सिजन सिलेंडरचे वाटप

इगतपुरी । Igatpuri

- Advertisement -

मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष तथा लॉयन फांऊडेशनचे संस्थापक संदीप कीर्वे यांच्या वतीने इगतपुरी ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटरला १० ऑक्सीजन सिलेंडरचे मोफत वाटप करण्यात आले.

तसेच बेडसह अत्यावश्यक उपकरणे पुरवण्याची माहिती संदीप कीर्वे यांनी दिली. मागील आठवड्यात ग्रामीण रुग्णालय व कोपरगांव येथील कोविड सेंटर येथे ऑक्सीजनचे बेड वाढवण्यात यावे, या मागणीचे निवेदन तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना देण्यात आले होते.

याबाबत ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वरूपा देवरे यांच्याशीही संपर्क साधला असता त्यांनी आमच्याकडे बेड आहेत. मात्र ऑक्सीजन सिलेंडर नसल्यामुळे बेड वाढवता येत नाही असे कळवले होते.

या पार्श्वभूमीवर मनसेचे डॉ. प्रदिप पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत जिल्हा उपाध्यक्ष संदीप कीर्वे यांनी स्वता:च्याही वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत ग्रामीण रुग्णालयाला २० सिलेंडर देण्याचे कबुल करत आज १० ऑक्सीजन सिलेंडर मोफत दिले असुन उर्वरीत सिलेंडर पुढील आठवड्यात देण्याचे कबुल केले.

संदीप कीर्वे यांनी यावेळी सांगितले की, ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटरला ऑक्सीजन बेडसह अत्यावश्यक उपकरणे मोफत पुरवण्यात येईल अशी ग्वाही यावेळी दिली.

तालुक्यातील सर्वच सधन नागरिकांनी आपल्या वाढदिवसाच्या खर्चाच्या बदल्यात कोविड सेंटरला अत्यावश्यक उपकरणाचे साहित्य दिल्यास रुग्णांच्या उपचारासाठी नक्कीच दिलासा मिळेल. त्याचप्रमाणे महामारीच्या या काळात तालुक्यातील कंपन्यांनी आपल्या सीएसआर फंडातुन कोविड सेंटरला मदत केल्यास रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा केल्याचे समाधान मिळेल.

— संदीप कीर्वे, मनसे जिल्हा उपाध्यक्ष

- Advertisment -

ताज्या बातम्या