दिल्ली | Delhi
६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचा आज वितरण सोहळा पार पडला आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.
सुपर स्टार रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात आले.
हिंदी चित्रपटांच्या विभागात अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या ‘छिछोरे’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
तसेच कंगना रनौतला दोन चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. कंगनाला ‘मणिकर्णिका’ आणि ‘पंगा’ या चित्रपटातील अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले.
अभिनेता धनुष आणि मनोज बाजपेयी यांनी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार स्वीकारला आहे.
सर्वोत्कृष्ट गायक बी पार्क तर सर्वोत्कृष्ट गायिका मराठमोळी सावनी रविंद्र ठरली आहे. सावनीला ‘रान पेटलं’ (बार्डो) साठी पुरस्कार मिळाला आहे.