Saturday, May 4, 2024
Homeनगरविळद-पिंपरी येथेे 'अर्सेनिक अल्बम 30' औषधाचे वाटप

विळद-पिंपरी येथेे ‘अर्सेनिक अल्बम 30’ औषधाचे वाटप

अहमदनगर (प्रतिनिधी) – मानवी शरीरात प्रतिकारशक्ती निर्माण करणार्‍या अर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथी गोळ्यांचे आमदार निलेश लंके प्रतिष्ठानच्यावतीने आ. लंके यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते विळद-पिंपरी येथील नागरिकांना मोफत वाटप करण्यात आले. डॉ. प्रमोद लंके यांनी उपस्थितांना औषधाबाबत माहिती दिली.

यावेळी राष्ट्रवादीचे बाळासाहेब जगताप, अ‍ॅड. रमेश जगताप, रासपचे संजय बाचकर, कैलास अडसुरे, ग्रामविकास अधिकारी सागर खळेकर, प्रकाश गायकवाड, सुनील कोकरे, रामभाऊ खताळ, संतोष अडसुरे, भाऊसाहेब पठारे, बापूसाहेब जगताप, कैलास शिंदे, प्रशांत अडसूरे, रभाजी चंद, राजेंद्र अडसुरे, अमोल कांबळे, आप्पा नेमाने, किरण बाचकर, पोपट बाचकर, प्रवीण कोकरे, ऋत्तिक पगारे, दादा बाचकर, बबलू कांबळे, विशाल कांबळे, आकाश कांबळे, अजय कांबळे, सार्थक कांबळे, उद्योजक विपुल, सुहास नगरे, अनिल सूर्यवंशी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस आदी उपस्थित होते.

- Advertisement -

दरम्यान करोनावर अद्याप कोणतेही औषध सापडलेले नाही. मात्र श्वसनसंस्थेवरील आजारांसाठी आणि प्रतिकार शक्तीच्या वाढीसाठी होमिओपॅथीमध्ये आधीच असलेल्या अर्सेनिक अल्बम 30 या औषधाचे चांगले परिणाम दिसत असल्याचे आयुष मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. आयुष मंत्रालयाच्या निर्देशानुसार या औषधांचे वाटप केले जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या