Friday, May 3, 2024
Homeनाशिकगरजू मुलांना निशुल्क श्रवण यंत्राचे वाटप

गरजू मुलांना निशुल्क श्रवण यंत्राचे वाटप

नाशिक । Nashik

संवाद स्पीच अँड हेअरिंग क्लिनिक आणि सोनोवा हिअर द वर्ल्ड ,स्वित्झर्लंड यांच्या संयुक्त विद्यमाने गांधी जयंती निमित्त सामाजिक कार्याची परंपरा कायम ठेवत गरीब व गरजू मुलांना निशुल्क श्रवण यंत्राचे वाटप करण्यात आले.

- Advertisement -

श्रवण यंत्र मिळाल्यानंतर मुलांच्या व पालकांच्या चेहऱ्यावर आनंदाने हसू फुलले. भारतात गेल्या तीन वर्षांपासून सोनोवा हिअर द वर्ल्ड यांनी दरवर्षी गरजू अनेक मुलांना डिजिटल श्रवण यंत्र देण्याचा पण केला आहे.

यावर्षी या कार्यासाठी महाराष्ट्रातून नाशिकचे संवाद स्पीच अँड हिअरींग क्लीनिक पहिले मानकरी ठरले. ही नाशिककरांसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. संवाद स्पीच अँड हिअरींग क्लीनिक नाशिकमध्ये अठरा वर्षांपासून श्रवण-वाचा-भाषा क्षेत्रात नैतिक मूल्यांची जपणूक करत विविध सामाजिक उपक्रम राबवून उत्तम विश्वासार्ह सेवा देत आहे.

प्रत्येक श्रवणदोष असलेल्या मुलाला चांगले ऐकण्याची संधी मिळावी या ध्येयाने आतापर्यंत सोनवा ही अर्धवट या संस्थेने अनेक मुलांना श्रवण यंत्र देऊन त्यांचे आयुष्य बदलले आहे.

ही श्रवण यंत्र पूर्णता डिजिटल आणि कॉम्प्युटर कॉम्प्युटर द्वारे सेटिंग करता येणारी आहेत असे संवाद क्लिनिकचे संचालक दांपत्य ऑडिओ लॉज ईस्ट आणि स्पीच थेरपिस्ट राहुल वैद्य व गायत्री वैद्य यांनी सांगितले.

ही श्रवण यंत्र वॉटरप्रूफ आहेत, अशी श्रवण यंत्रे खूप महाग असल्यामुळे प्रत्येकाला विकत घेणे परवडत नाही. अशा प्रकारची प्रगत तंत्रज्ञान असलेली श्रवणयंत्र वापरल्यामुळे श्रवण बाधित मुलांचा भाषा, वाचन, विकास उत्तम प्रकारे होऊ शकतो.

या सोहळ्यासाठी सोनोवा हिअरींग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक रजनीश कामत व त्यांचे सहकारी तसेच संवाद क्लीनिक मधील तज्ञ मंडळी उपस्थित होते. संवाद स्पीच अँड हिअरींग क्लीनिक नाशिक यांनी त्यांच्या यशस्वी कार्यकाळात कित्येक लहान मुले प्रौढ वयस्कर व्यक्तींना ऐकण्याचा आनंद दिला आहे. दिव्यांगांच्या विकासाकरता संवाद टीम सदैव समर्पित आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या