Saturday, July 27, 2024
Homeनाशिकएक हजार शेतकर्‍यांना केशर आंबा रोपे वाटप

एक हजार शेतकर्‍यांना केशर आंबा रोपे वाटप

नाशिक । प्रतिनिधी Nashik

हरियाली प्रकल्पांतर्गत महिंद्रा आणि महिंद्रा लि. इगतपुरी आणि यश फाउंडेशनने इगतपुरी तालुक्यातील भरवज, पिंपळगाव भटाटा, कुरुंगवाडी, बोरली आणि शेनवड गावातील एक हजार शेतकर्‍यांना 12 हजार कलमी केशर आंब्याचे रोपे वाटप करण्यात आले आहे.

- Advertisement -

कार्यक्रमाचे उद्घाटन भारवाज गावात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आले. हरियाली वृक्षारोपण या उपक्रमाचा मुख्य उद्देश पर्यावरणाचे संरक्षण, संरक्षण आणि देखरेख सुधारणे आणि प्रोत्साहन देणे हा आहे. त्याचप्रमाणे वृक्षारोपणद्वारा कलमी केशर आंब्याचे लागवड शेतकर्‍यांना करण्यास सहकार्य करून त्यांच्या उत्पन्नात भर पाडणे हा देखील हेतू या कार्यक्रमाचा असल्याचे प्रास्ताविकात यश फाऊंडेशनचे रवी पाटील यांनी विषद केले.

उद्घाटनाप्रसंगी महिंद्रा आणि महिंद्रा इगतपुरीचे प्रमुख राजेश खानोलकर, जिल्हा वाहतूक शाखा-नाशिक ग्रामीणचे पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील, कैलाश ढोकणे, जयंत इंगळे, आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय युवा प्रसिद्धीप्रमुख आकाश भले, जाईबाई भले (सरपंच – भरवज निरपण), यश फाऊंडेशनचे अध्यक्ष रवींद्र पाटील आणि महिंद्रा आणि महिंद्रा इगतपुरीचे अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

यावेळी पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांनी आपल्या मनोगतात गावकर्‍यांनी वृक्षारोपण करून पर्यावरणाचे संवर्धन, संरक्षण आणि जतन करा आणि हीच वृक्ष उद्या तुमच्या उत्पन्नात भर पडणार असल्याचे सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या