Saturday, July 27, 2024
Homeनाशिकविद्यार्थ्यांना रेडिओंचे वाटप

विद्यार्थ्यांना रेडिओंचे वाटप

दिंडोरी । प्रतिनिधी Dindori

दिंडोरी तालुक्यातील निळवंडी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गरजु विद्यार्थ्यांना रेडीओंचे वाटप करण्यात आले .

- Advertisement -

दिंडोरी पंचायत समिती माजी उपसभापती कैलास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या संकल्पनेतून व शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर यांच्या मार्गदर्शनाने डोनेट अ डिव्हाईस हे अभियान जिल्हाभर सुरू असून गरीब, गरजू विद्यार्थ्यांना मोबाईल, दुरदर्शनसंच, लॅपटॉप, रेडिओ डोनेटकरून त्यांचे अध्ययन सुकर करण्याचा प्रयत्न केला जातो.

त्याचाच एक भाग म्हणून निळवंडी येथील गरजू विद्यार्थ्यांना रेडिओ डोनेट केले. यावेळी निळवंडी येथील जि. प. प्राथमिक शाळेत पंचायत समिती माजी उपसभापती कैलास पाटील, सरपंच एकनाथ डंबाळे, जय कानिफनाथ पाणी वापर संंस्थेचे व्हा.चेअरमन सुनील पाटील, ग्रा.प.सदस्य कचरु पाटील यांच्या उपस्थितीत रेडिओ वितरण करण्यात आले.

दररोज सकाळी ठिक 9.40 वाजता 10 .40 या वाहिनीवर विद्यावाहिनीच्या शैक्षणिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी कैलास पाटील यांनी स्वत: 5 रेडीओ डोनेट भेट दिले. याप्रसंगी मुख्याध्यापिका मुळे, धनराज नांद्रे, पालक बाळू पाटील, सुवर्णा वायकांडे, गवारे, विजय देशमुख, प्रवीण निकुंभ, बापू पाटोळे , बबन पोदींदे यांच्यासह शालेय व्यवस्थापन समिती पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या