Tuesday, November 26, 2024
Homeक्रीडाखो-खो खेळाडूंना स्वेटर वाटप, सावित्री फाउंडेशनचा उपक्रम

खो-खो खेळाडूंना स्वेटर वाटप, सावित्री फाउंडेशनचा उपक्रम

नाशिक । Nashik

नाशिक जिल्हा खो-खो संघटनेतर्फे राबविण्यात येणार्‍या देशातील पहिल्या आदिवासी खो-खो मुली प्रबोधिनीतील खेळाडूंना ऋचा गुजर यांच्या तर्फे थंडी पासून बचाव करण्यासाठी स्वेटर देण्यात आले.

- Advertisement -

या सर्व मुली शासकीय कन्या शाळेत शिकत आहे . ऑफ लाईन शिक्षण घेण्यासाठी या खेळाडू नाशिक येथे आलेल्या आहेत. स्वेटर वाटपाचा कार्यक्रम सावित्री फाउंडेशन च्या माध्यमातून चैतारापती शिवाजी स्टेडियम येथील खो-खो च्या प्रशिक्षण केंद्रावर आयोजित करण्यात आला होता.

हे विनामूल्य प्रशिक्षण केंद्र क्रीडाधिकारी करायचाय नाशिक व नाशिक जिल्हा खो-खो संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने चालविले जात आहे .

या कार्यक्रमास सावित्री फाउंडेशनचे मधुकर राऊत, त्रंबक भागवत, मुक्तेश्वर मुनशेट्टीवार व या साठी ज्यांनी मोलाचे सहकार्य केले.

अशा स ऋचा गुजर, विमल लखपती, शुभा खंडेतोड जिल्हा खो-खो संघटनेचे सचिव उमेश आटवणे सहसचिव दत्ता गुंजाळ व गीतांजली सावळे उपस्थित होत्या. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वातीताई वानखेडे अध्यक्ष सावित्री फाउंडेशन यांनी विशेष परिश्रम घेतले .

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या