Saturday, May 4, 2024
Homeनगरसंगमनेर, नगरमध्ये करोनाचा कहर सुरूच !

संगमनेर, नगरमध्ये करोनाचा कहर सुरूच !

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यात करोना संसर्गाची साखळी तुटण्याचे नाव घेताना दिसत नाही. शनिवारी जिल्ह्यात पुन्हा नव्याने दोन टप्प्यांत 33 नवे करोना बाधित रुग्ण समोर आले आहेत. यामुळे जिल्ह्यात करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 577 वर पोहचली असून अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 177 झाली आहे. दरम्यान, काल 16 रुग्णांनी करोनावर मात देखील केली असून यामुळे करोना मुक्तांचा आकडा 385 झाला आहे.

दरम्यान, नगर शहरातील चौघांचे आणि श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील एकाचा असे 5 व्यक्तींचे खासगी प्रयोग शाळेतील करोना अहवाल पॉझिटिव्ह आलेे आहेत. यात माणिकनगरमधील रहिवासी असणारे आणि कापड बाजारात दुकान असणार्‍या पिता-पुत्र, नवीपेठेतील महिला व बीड जिल्ह्यातील मुळचा पण नगरच्या खासगी हॉस्पिटलला उपचार घेणारा आणि श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील एक व्यक्ती असे पाच जणांचे खासगी प्रयोग शाळेतील अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत. खासगी प्रयोग शाळेने हे अहवाल जिल्हा आरोग्य यंत्रणेला पाठविलेले आहेत. सरकारच्या पोर्टलवर त्यांची नोंद झाल्यावर या रुग्णांची भर जिल्ह्याच्या आकडेवारी करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

- Advertisement -

जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये शनिवारी सकाळी 26 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले होते. यामध्ये संगमनेर तालुक्यातील 13, नगर शहर 8, कोपरगाव तालुका 2, अकोले 2 आणि बीड जिल्ह्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. नगर शहरात नव्याने सापडलेल्या आठ रुग्णांमध्ये गवळी वाडा, पाईपलाईन हडको, ढवणवस्ती, चितळे रोड येथील रुग्णांचा समावेश आहे.

यासह कोपरगाव तालुक्यातील कारंजा चौक, येसगाव आणि धारणगाव दवंडे मामा वस्ती येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळून आले. अकोले शहरात 2, संगमनेर तालुक्यातील कुरण येथे 8, संगमनेर खुर्द येथे 1, घुलेवाडी येथे 1, संगमनेर शहरातील रहेमत नगर 1, विठ्ठलनगर 1, श्रमिकनगर 1 असे तालुक्यात 13 रुग्ण आढळले. याशिवाय, बीड जिल्ह्यातील कारखेल (ता. आष्टी) येथील एक रुग्ण असे 26 पॉझिटिव्ह आढळले आहेत.

सायंकाळी आलेल्या अहवालात आणखी 7 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये पारनेर तालुक्यातील पिंपळगाव रोठा या गावातील 5 जण, कुंभारवाडी (ता. पारनेर) गावातील एक जण आणि अशोकनगर, श्रीरामपूर येथील एका रुग्णाचा समावेश आहे. यामुळे सकाळचे 26 आणि सायंकाळचे 7 अशा 33 नव्या रुग्णांची भर जिल्ह्याच्या आकडेवारीत पडली आहे.

जिल्ह्यातील 16 करोनाग्रस्त रुग्ण शनिवारी बरे झाले. या रुग्णांनी करोनावर मात करून हा आजार बरा होऊ शकतो, हे दाखवून दिले. यामध्ये संगमनेर तालुक्यातील कुरण येथील एका 85 वर्षीय आजीबाईंचा समावेश आहे. यासह नगर मनपा 5, संगमनेर आणि श्रीगोंदा तालुक्यातील प्रत्येकी तीन, राहाता तालुका 2, पारनेर, श्रीरामपूर आणि कोपरगाव तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. करोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 385 झाली आहे. सध्या रुग्णालयात 177 रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात 15 रुग्ण या आजाराने दगावले आहेत. सध्या जिल्ह्यातील एकूण नोंद रुग्ण संख्या 577 इतकी झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या