Sunday, May 26, 2024
Homeनगरकरोना पॉझिटिव्हचा आकडा 934

करोना पॉझिटिव्हचा आकडा 934

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

जिल्ह्यातील करोना संक्रमणाचा वेग वाढला आहे. शनिवारी दिवसभरात 90 करोनाबाधित आढळले. रात्री 12 च्या सुमारास सरकारी प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालात 27 जण करोनाबाधित होते. त्याआधी सरकारी प्रयोगशाळेतून 43 तर खासगी प्रयोगशाळेतून 47 अहवाल पॉझिटिव्ह आले. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 934 झाली आहे. एकट्या नगर शहरात 62 बाधित आढळले आहेत.

- Advertisement -

दिवसभरात सरकारी प्रयोग शाळेतून 16 तर खासगी प्रयोग शाळेतून 47 करोना पॉझिटिव्ह समोर आले आहेत. यात नगर महानगर पालिका हद्दीत सरकारी आणि खासगी प्रयोग शाळेचे 63 आणि संगमनेरमधील 16 पॉझिटिव्हचा समावेश आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅमध्ये शनिवारी नव्याने 16 जणांचे अहवाल पॉझिटिव आढळून आले. यात संगमनेर येथील 10, नगर महापालिका क्षेत्रातील 3 नेवासा तालुक्यातील 1, जामखेड तालुक्यातील 1 आणि पुणे जिल्ह्यातील एक रुग्ण बाधित आढळून आला आहे. संगमनेर शहरातील पंजाबी कॉलनी येथील 5, नवघरगल्ली येथील 1 तसेच संगमनेर तालुक्यातील नान्नज येथील 2, खांडगाव आणि चिखली येथील प्रत्येकी 1 जण बाधित आढळून आला आहे. नेवासा तालुक्यातील गुंडगाव येथील 1, जामखेड तालुक्यातील लोणी (पोस्ट- खर्डा) येथील 1 रुग्ण बाधित आढळले आहेत. तसेच नगर शहरात गुलमोहर रोड, आशा टॉकीज आणि सारसनगर या भागात प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला. तसेच विश्रांतवाडी (पुणे) येथील एक रुग्ण बाधित आढळून आला आहे.

तर खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या 47 रुग्णांमध्ये नगर महापालिका क्षेत्रातील 34, कोपरगाव 1, नगर ग्रामीण 1, पारनेर 2, राहाता 3, संगमनेर 4 आणि श्रीरामपूर येथे 2 रुग्ण बाधित आढळले आहेत. काल नव्याने 63 रुग्ण समोर आल्याने जिल्ह्यातील करोना बाधितांचा आकडा 907 वर पोहचला आहे.

रात्री उशिरापयरत पुन्हा 27 अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यात नगरमधील 25 जणांचा तर संगमनेर व सोनई येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

जिल्ह्यात सध्या 319 पॉझिटिव्ह आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 568 रुग्णांनी करोनावर मात केली असून 20 रुग्णांनी करोनाशी लढतांना मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयातील नोडल अधिकारी यांनी दिली.

शनिवारी जिल्ह्यातील 39 रुग्णांनी करोनावर मात केली आहे. यात नगर मनपा 15, राहाता 3, श्रीरामपूर 3, पाथर्डी, कोपरगाव, अकोले प्रत्येकी 2,पारनेर 6, शेवगाव, नेवासा, संगमनेर, राहुरी, बीड, भिंगार प्रत्येकी 1 रुग्ण यांचा समावेश आहे.

जिल्हा परिषदेचे सभापती सुनील गडाख हे करोना बाधितांच्या संपर्कात आले होते. यामुळे त्यांनी दोन दिवसांपासून स्वत:ला नगरमधील निवासस्थानी होम क्वरांटाईन केले होते. तसेच शुक्रवारी स्त्राव नमुना तपासणीसाठी पाठविला होता. त्याचा अहवाल शनिवारी रात्री उशीरा आला असून त्याते निगेटिव्ह आले असल्याचे आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात आले.

नगर मनपा 37, संगमनेर 14, नेवासा 1, जामखेड 1, पुणे 1, कोपरगाव 1, नगर ग्रामीण 1, पारनेर 2, राहाता 3 आणि श्रीरामपूर 2 असे सरकारी व खासगी प्रयोग शाळेचे अहवाल आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या