Saturday, May 18, 2024
Homeनगरजिल्ह्यात आणखी 06 रुग्ण वाढले

जिल्ह्यात आणखी 06 रुग्ण वाढले

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

जिल्हा सामान्य रुग्णालय येथील करोना टेस्ट लॅबमध्ये आज 06 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये नगर शहरातील सर्जेपूरा भागातील 03, पाईपलाईन रोड 01, नगर ग्रामीण मध्ये विळद 01 आणि पाथर्डी येथील एक रुग्ण आढळून आले आहे. यामुळे जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या आता 307 इतकी झाली आहे. तर एकूण रुग्णांची संख्या 963 इतकी झाली आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात आज सकाळी 66 रुग्ण करोनावर मात करून घरी परतले. त्यामुळे जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता 634 इतकी झाली आहे.

दरम्यान, शनिवारी रात्री उशिरा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅब मध्ये 27 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. त्याचबरोबर खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या चाचणीत बाधित आढळलेल्या 23 रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली.

दरम्यान, आज 193 व्यक्तींचे करोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या