Tuesday, April 1, 2025
Homeनगरजिल्ह्यात 658 प्राथमिक शाळा खोल्यांची गरज

जिल्ह्यात 658 प्राथमिक शाळा खोल्यांची गरज

जिल्हा परिषद : तीन वर्षांत 434 शाळा खोल्यांची निर्मिती

अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्यात आकारमानाने सर्वात मोठ्या असणार्‍या नगर जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचा मोठा प्रश्न आहे. जिल्ह्यात मोडकळीस आलेल्या, बसण्यास अयोग्य आणि उघड्यावर भरणार्‍या शाळा खोल्यांची संख्या 1 हजार 92 होती. मात्र, तीन वर्षांत जिल्हा नियोजन समिती आणि शिर्डी संस्थानच्या माध्यमातून 32 कोटी 83 लाख रुपयांतून 434 शाळा खोल्यांची निर्मिती झाली असली तरी अद्याप जिल्ह्यात 658 शाळा खोल्यांची गरज आहे. यासाठी कोट्यवधी रुपयांची गरज जिल्हा परिषदेला आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात साडेतीन हजारांहून अधिक शाळा आहेत. याठिकाणी मोठ्या संख्येने ग्रामीण विद्यार्थी शिक्षणाचे धडे घेत आहेत. नगर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळेतील शैक्षणिक गुणवत्ताही खासगी शाळांपेक्षा दर्जेदार असल्याने जिल्हा परिषदेच्या शाळेला मोठे महत्व आहे. जिल्हा परिषद पदाधिकारी, शिक्षण समितीचे सदस्य आणि शिक्षणाधिकारी यांचे जिल्हा परिषदेच्या शाळेतील गुणवत्ता विकासवर विशेष लक्ष असल्याने खासगी प्राथमिक शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषदेच्या शाळांचा निकालाचा टक्का अधिक आहे. यामुळे आजही ग्रामीण भागात पहिले प्राधान्य जिल्हा परिषदेच्या शाळांना आहे.

मात्र, जिल्ह्यातील प्राथमिक शाळा हा शाळा खोल्यांच्या भौतिक सुविधेच्या समस्यने त्रस्त आहे. त्यांच्या मदतीला गेल्यावर्षी शिर्डीचे साईबाबा संस्थान धावून आले असले तरी नियमांच्या कचाट्यात संस्थाने जाहीर केलेला 30 कोटी रुपयांचा निधीपैकी अवघा 10 कोटींचा निधी जिल्हा परिषदेला शाळा खोल्यांसाठी मिळणार आहे. त्यातून अवघ्या 124 शाळा खोल्या निर्माण होणार आहे. यामुळे आता जिल्हा परिषदेला शाळा खोल्यांसाठी लोक चळवळीस अन्य पर्याय निवडावे लागणार आहेत.

जिल्हा नियोजन मंडळाकडून मिळणार्‍या निधीतून जिल्हा परिषदेने तीन वर्षात 449 शाळा खोल्याची दुरूस्ती, डागडूजी करण्यात आली असून त्यासाठी 4 कोटी 63 लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. नव्याने शाळा खोल्यासह शाळांच्या दुरूस्तीसाठी जिल्हा परिषदेला मोठ्या प्रमाणात निधीची गरज आहे.

तीन वर्षांत झालेल्या शाळा खोल्या
2017-18 मध्ये 148 शाळा खोल्या
2018-19 मध्ये 57 शाळा खोल्या
2019-20 मध्ये 105 शाळा खोल्या
शिर्डी संस्थानकडून 124 शाळा खोल्या

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

गोवा बनावट विदेशी दारू पकडली; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेली गोवा राज्य बनावट विदेशी दारू अवैधरीत्या वाहतूक करणार्‍यांविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली आहे. कारवाईदरम्यान दारू व...