Saturday, May 4, 2024
Homeनगरजिल्हा वार्षिक योजनेचा निधी वेळेत खर्च करा

जिल्हा वार्षिक योजनेचा निधी वेळेत खर्च करा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

आगामी काळात जिल्ह्यात होऊ घातलेल्या निवडणूक आचारसंहितेचा कालावधी लक्षात घेऊन 31 मार्च 2022 पर्यंत 100 टक्के निधी खर्च झाला पाहिजे, असे नियोजन करावे. तसेच पुढील वर्षासाठी 2022-23 प्रारूप आराखडा तात्काळ सादर करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिल्या आहेत.

- Advertisement -

जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वार्षिक योजना आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा वार्षिक योजना सन 2021-22 अंतर्गत जिल्ह्याकरिता 510 कोटी रुपये इतका नियतव्यय मंजूर असून जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी आपआपल्या विभागांना मंजूर झालेला निधी वेळेत खर्च करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दिल्यात. ज्या विभागांनी निधीची मागणी केली आहे त्यांनी आपल्या प्रस्तावित कामांबाबत निधीच्या खर्चाचे नियोजन करून आपापल्या मुख्यालयाकडून तांत्रिक मान्यता घेऊन आपले प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी तात्काळ सादर करावेत.

जिल्हा परिषदेने आपल्या विविध विभागांसाठी लागणार्‍या निधीची मागणी व नवीन कामांचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावेत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, जिल्हा नियोजन अधिकारी निलेश भदाणे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी राजेंद्र भवारी आदी मान्यवर उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या