Saturday, May 25, 2024
Homeनाशिकजिल्हा बँक कंत्राटी सेवकांचा प्रशासकांना घेराव

जिल्हा बँक कंत्राटी सेवकांचा प्रशासकांना घेराव

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ( NDCC Bank ) कंत्राटी पद्धतीने भरती झालेल्या सेवकांनी ( Contractual Workers ) पुन्हा बँकेत धडक देत प्रशासक अरुण कदम यांना घेराव घातला.

- Advertisement -

नाबार्ड तसेच सहकार विभागाची परवानगी न घेता सहा वर्षांपूर्वी संचालक मंडळाच्या कार्यकाळात 415 लिपिक आणि शिपायांची कंत्राटी पध्दतीने भरती करण्यात आली. ही भरती बेकायदेशीर ठरली. जोपर्यंत संचालक मंडळ अस्तित्वात होते तोपर्यंत या भरतीबाबत सर्वकाही आलबेल होते. मात्र, आता भरतीचा मुद्दा चांगलाच तापला आहे. औद्योगिक न्यायालयाने या सेवकांना सेवेत कायम करण्यासाठी दाखल केलेली याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे संबंधितांच्या सेवा धोक्यात आल्या आहेत.

यावर आक्रमक झालेल्या सेवकांनी सोमवारी (दि.20) बँकेत ठिय्या मांडला होते. बुधवारी पुन्हा हे सेवक बँकेत धडकले. प्रशासक कदम यांच्याशी त्यांची चर्चा झाली. कदम यांनी या प्रकरणात आपण काहीही करू शकत नसल्याचे सांगत संबंधितांना उच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला.

सेवक भरतीमध्ये नलावडे यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यांनीच न्यायालयात भरती नियमबाह्य आणि बेकायदेशीर असल्याचे शपथपत्र सादर केल्याने सेवकांचा त्यांच्यावर रोष आहे. यावेळी नलावडे यांना जाब विचारण्यात आला. तसेच न्यायालयीन लढाई लढण्यासाठी त्यांना 20 लाख रुपये दिल्याचे सेवकांनी कदम यांना सांगितले. हे पैसे आपण वकिलाला दिल्याची कबुली नलावडे यांनी दिली. यात कदम यांनी मध्यस्थी करीत सेवकांना उच्च न्यायालयात लढण्यासाठी मदत करा, असे सुचविले. तर नलावडे यांनीही ते मान्य केले. चार वाजेपर्यंत कदम यांना घेराव घालण्यात आला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या