Friday, July 24, 2026
HomeनगरAkole : जिल्हा बँक निवडणुकीसाठी अकोले तालुक्यातून 86 ठराव प्राप्त

Akole : जिल्हा बँक निवडणुकीसाठी अकोले तालुक्यातून 86 ठराव प्राप्त

अकोले |प्रतिनिधी| Akole

अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीसाठी अकोले तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून एकूण 86 ठराव प्राप्त झाले आहेत. जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सिताराम पाटील गायकर, आमदार डॉ. किरण लहामटे, माजी आमदार वैभवराव पिचड तसेच अन्य ज्येष्ठ नेत्यांच्या सक्रियतेमुळे गावागावांत ठराव मंजूर करताना मोठी चुरस पाहायला मिळाली.

- Advertisement -

प्राप्त ठरावानुसार शरद चौधरी (अंभोळ), मुरलीधर चौधरी (रेडे), बाळासाहेब भोर (धामणगाव आवारी), दैनू घिगे (पैठण), संपत कोटकर (कुंभेफळ), सौ. अर्चना विलास भांगरे (तांभोळ), सौ. संजीवनी गोविंद शिंदे (उंचखडक खुर्द), विकास शेटे (ढोकरी), सौ. भीमाबाई सिताराम गायकर (मोग्रस), संतोष देशमुख (कोतूळ), संतोष दातखिळे (टाकळी), अशोक गावंडे (समशेरपूर), दत्तात्रय जाधव (सावरगाव पाट), दत्तात्रय वाकचौरे (परखतपूर), सौ. जयश्री परबत नाईकवाडी (गर्दनी), निवृत्ती बेंडकोळी (तिरढे), भारत आरोटे (ब्राम्हणवाडा), अशोक आहेर (गणोरे), सुनील वाळुंज (औरंगपूर), दत्तात्रय साबळे (बोरी), विठ्ठल तळपाडे (सांगवी), चंदर बांडे (रतनवाडी), मधुकर नवले (अकोले), सचिन वैद्य (सुगाव खुर्द), रावजी मधे (उडदावणे), सौ. छाया प्रकाश देशमुख (भोळेवाडी), अमित भांगरे (शेंडी), दत्तू घाणे (वारंघुशी), विठ्ठल कोरडे (रंधा), अतुल लोहटे (रुंभोडी), राजेंद्र डावरे (निंब्रळ), मधुकर बिन्नर (टाहाकारी), यशवंत चंदगीर (एकदरे), सविता सुभाष काकड (देवठाण), दशरथ बेनके (खिरविरे), कैलास वाकचौरे (कळस बुद्रुक), सौ. अलका शिवाजी हासे (इंदुरी), रोहिदास जाधव (अंबड), एकनाथ शेळके (चास), लक्ष्मण मेमाने (सातेवाडी), झीपा कचरे (पळसुंदे), सुधाकर गोडे (अबितखिंड), रेवचंद भोर (धामणगाव पाट), सुशांत शेटे (पिंपळगाव खांड), रावसाहेब वाकचौरे (विरगाव), सुरेश गडाख (कळस खुर्द), बाळू कासार (पिंपळगाव नाकविंदा), अमित हासे (म्हाळादेवी), सौ. निर्मला भानुदास वावळे (बहिरवाडी), भाऊसाहेब वावळे (मेहेंदुरी), सौ. सुनीता ज्ञानेश्वर कदम (हिवरगाव आंबरे), अशोक उगले (डोंगरगाव), पांडुरंग नाडेकर (कोहने), किरण लहामटे (कोथळे), बाबाजी फापाळे (बेलापूर), शिवनाथ हुलवळे (जाचकवाडी), सौ. मालती गणेश शिंगोटे (बदगी), कैलास देशमुख (उंचखडक बुद्रुक), संभाजी डोंगरे (पांगरी), संदीप बिन्नर (केळी), गणपत गोडे (केळी-कोतूळ), सतीश वाकचौरे (वाशेरे), विश्वास रक्टे (वाघापूर), भाऊ भांगरे (मनोहरपूर), वैभव पिचड (सुगाव बुद्रुक), अशोक गावंडे (चैतन्यपूर), सुभाष गोडसे (लहित खुर्द), बबन तोरमल (पिंपळगाव निपाणी), भाऊ कानवडे (लिंगदेव), नागू बांबळे (मवेशी), रखमा देशमुख (राजूर), रंगनाथ आरोटे (चितळवेढे), दगडू धिंदळे (शिरपुंजे), पोपट भांगरे (साकीरवाडी), सौ. अलकाबाई मारुती तांबेकर (वांजुळशेत), सोपान मांडे (पिंपळदरी), शिवाजी नवले (शेलद), हरिभाऊ मातेले (जांभळे), भाऊसाहेब भोर (कळंब), सुधाकर भांगरे (देवगाव), तानाजी धोंगडे (लाडगाव), सौ. पाराबाई नामदेव रावते (पिंपरकणे), रामदास खाडगीर (कातळापूर), रावसाहेब वाकचौरे (विठे), संपत शेळके (मन्याळे) आणि गोगा पदमेरे (बारी) या संबंधित संस्थांनी आपल्या प्रतिनिधींची नावे मंजूर केली आहेत.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया वेग घेत असून, अकोले तालुक्यात विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या ठरावांमधून स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे आणि नेत्यांची ताकद स्पष्टपणे दिसून येत आहे. पुढील टप्प्यात उमेदवारी अर्ज, छाननी आणि माघारीनंतर निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.

ताज्या बातम्या

Shirdi : साईबाबांची भूमिका साकारणारा अभिनेता समाधीवर बसला!

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi साईबाबांच्या समाधीवर चित्रपटातील साईबाबांची भूमिका साकारणारा अभिनेता बसल्याचा व्हिडिओ आणि छायाचित्रे समोर आल्यानंतर शिर्डी पुन्हा एकदा वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे. कोट्यवधी साईभक्तांच्या...