Saturday, May 4, 2024
Homeनगरपवार-थोरातांकडून लाईन-दोरी पक्की!

पवार-थोरातांकडून लाईन-दोरी पक्की!

अहमदनगर |प्रतिनिधी|Ahmednagar

संगमनेर, पुणे आणि मुंबईत झालेल्या दीर्घ खलबतांअंती अहमदनगर जिल्हा सहकारी बँक निवडणुकीसाठी

- Advertisement -

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पॅनलसाठीची लाईन-दोरी निश्चित केल्याची माहिती आहे. गेल्या आठवड्यात मुंबईत या नेत्यांनी वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतले, त्याची कल्पना स्थानिक नेत्यांना दिली. आता सोमवारपासून या निर्णयानुसार पावले पडतील, असे सूत्रांनी सांगितले.

महिनाभर जिल्हा बँक पंचवार्षिक निवडणुकीमुळे चर्चेत आहे. सहकारातील अग्रणी आणि राज्यातील मातब्बर नेत्यांची बँक असल्याने राजकीयदृष्ट्या बँक निवडणूक लक्षवेधी ठरत आहे. बँकेत पक्षीय राजकारण करायचे नाही, हा येथील सहकाराचा शिरस्ता असल्याने अचानक पक्षीय पॅनल मैदानात येणार असे म्हटले गेल्याने राजकारण ढवळून निघाले. मात्र दोन आठवड्यांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे.

बँक निवडणूक पक्षीय पॅनलच्या अंगाने पुढे सरकणार नाही, हे निश्चित झाले आहे. त्यासाठी आवश्यक बाबी पवार-थोरात यांनी पूर्ण केल्या आहेत. ना.बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर येथे घेतलेल्या बैठकीनंतर, पुणे आणि मुंबईत वरिष्ठ पातळीवरील बैठका झाल्या होत्या. रूसवे-फुगवे काढले

मुंबईतील बैठकांमध्ये स्थानिक राजकारणामुळे काही ‘रूसवे-फुगवे’ समोर आले. त्यावर मात करण्यात पवार-थोरात जोडीने यश मिळविल्याचे मानले जाते. यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे मार्गदर्शन कामी आल्याचे सुत्रांनी सांगीतले. अद्यापही काही अपवादांवर काम करणे शिल्लक असल्याने सोमवारपासून जिल्हा बँकेच्या हालचालींसाठी अहमदनगर केंद्रबिंदू ठरणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या