Tuesday, May 7, 2024
Homeनाशिक‘मिलेट पे चर्चा’ कार्यक्रमातून मिलेटची जनजागृती व्हावी - गंगाथरन डी

‘मिलेट पे चर्चा’ कार्यक्रमातून मिलेटची जनजागृती व्हावी – गंगाथरन डी

नाशिक । प्रतिनिधी

‘मिलेट पे चर्चा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये तृणधान्याचे महत्व व पौष्टीक गुणधर्म याबाबत जनजागृती व्हावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी केले.आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष २०२३ च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात कृषि विभाग व फार्मर प्रोड्यूसर कंपनी (फॉरमी फुडस्) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मिलेट पे चर्चा’ कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.

- Advertisement -

जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी मिलेट रथाचे फित कापून उदघाटन केले व मिलेटची माहिती नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी रथास हिरवा झेंडा दाखविला.यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, उपजिल्हाधिकारी रोहयो नितिन मुंडावरे, उपजिल्हाधिकारी निवडणूक शशिकांत मंगरूळे, उपजिल्हाधिकारी भिमराज दराडे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, कृषी उपसंचालक जगदिश पाटील तहसिलदार परमेश्वर कासोळे, कैलास पवार, अमोल निकम, फॉरमी फुडस कंपनीचे संचालक शशिकांत बोडके , डॉ. शरद बोडके आदी उपस्थित होते.

‘फॉरमी फूडस’ कंपनीचे संचालक शशिकांत बोडके यांनी फॉरमी फुडस च्या माध्यमातून मिलेटसचे प्रकार व त्यापासून बनविलेले उत्पादने यांची माहिती दिली. तसेच तृणधान्याच्या आहरातील वापर व त्याचे आरोग्याच्या दृष्टीने असलेले महत्व यावेळी उपस्थितांना विषद केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या