Saturday, July 27, 2024
Homeनगरनगर जिल्ह्यात आज 756 करोना बाधितांची वाढ

नगर जिल्ह्यात आज 756 करोना बाधितांची वाढ

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात आज 513 रुग्णांना रुग्णांलयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 36 हजार 157 इतकी झाली आहे.

- Advertisement -

रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 87.32 टक्के इतके झाले आहे. दरम्यान काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत 756 ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 4570 इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 160, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 236 आणि अँटीजेन चाचणीत 360 रुग्ण बाधित आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 67, अकोले 17, जामखेड 08, कर्जत 01, कोपरगाव 02, नगर ग्रामीण 13, नेवासा 06, पारनेर 01, पाथर्डी 07, शेवगाव 05, श्रीगोंदा 16, श्रीरामपूर 09, कँटोन्मेंट 02 आणि मिलिटरी हॉस्पिटल 06 अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या 236 रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये मनपा 87, अकोले 04, जामखेड 03, कर्जत 08, कोपरगाव 03, नगर ग्रामीण 24, नेवासा 15, पारनेर 07, पाथर्डी 09, राहाता 18, राहुरी 19, संगमनेर 02, शेवगाव 02, श्रीगोंदा 02, श्रीरामपूर 32 आणि मिलिटरी हॉस्पिटल 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज 419 जण बाधित आढळुन आले. यामध्ये मनपा 26, अकोले 18, जामखेड 21, कर्जत 14, कोपरगाव 25, नगर ग्रामीण 18, नेवासा 16, पारनेर 17, पाथर्डी 38, राहाता 32, राहुरी 09, संगमनेर 56, शेवगाव 36, श्रीगोंदा 10, श्रीरामपूर 23 आणि कॅन्टोन्मेंट 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान आज 513 रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये मनपा 80, संगमनेर 27, राहाता 58, पाथर्डी 36, नगर ग्रामिण 42, श्रीरामपूर 15, नेवासा 19, श्रीगोंदा 07, पारनेर 23, अकोले 46, राहुरी 33, शेवगाव 15, कोपरगाव 47, जामखेड 40, कर्जत 20, मिलिटरी हॉस्पिटल 03 आणि इतर जिल्हा 02 अशा रुग्णांचा समावेश आहे.

* बरे झालेली रुग्ण संख्या : 36157

* उपचार सुरू असलेले रूग्ण : 4570

* मृत्यू : 679

* एकूण रूग्ण संख्या : 41406

- Advertisment -

ताज्या बातम्या