Saturday, May 4, 2024
Homeनगरनगर जिल्ह्यात 3,365 करोनाग्रस्तांवर उपचार सुरू

नगर जिल्ह्यात 3,365 करोनाग्रस्तांवर उपचार सुरू

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यातील करोनाग्रस्तांच्या आकड्याने आता 17 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. सध्या जिल्ह्यात 3 हजार 365 करोनाच्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू असून रविवारी आणखी 566 नव्याने करोनाचे रुग्ण आढळले आहेत. करोना बळींची संख्या काल पाचने वाढल्याने एकूण बळींची संख्या आता 231 झाली आहे. दरम्यान करोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या आता 13 हजार 478 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे सध्या 78.94 टक्के आहे.

- Advertisement -

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये रविवार 98, अँटीजेन चाचणीत 234 आणि खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 234 रुग्ण बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 78, श्रीरामपूर 1, भिंगार कॅन्टोन्मेंट 4, पारनेर 3, अकोले 1, राहुरी 1, शेवगाव 1, जामखेड 5, कर्जत 1 आणि मिलीटरी ह़ॉस्पिटल 3 अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत काल 234 जण बाधित आढळून आले. यामध्ये, मनपा 4, संगमनेर 17, राहाता 9, पाथर्डी 19, नगर ग्रामीण 25, श्रीरामपूर 19, नेवासा 14, श्रीगोंदा 18, पारनेर 11, अकोले 8, राहुरी 5, शेवगाव 9, कोपरगाव 50, जामखेड 13 आणि कर्जत 13 अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या 234 रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा 141, संगमनेर 14, राहाता 6, पाथर्डी 4, नगर ग्रामीण 20, श्रीरामपूर 12, कॅन्टोन्मेंट 5, नेवासा 3, पारनेर 8, अकोले 5, राहुरी 7, शेवगाव 1, कोपरगाव 6 आणि कर्जत 2 अशा रुग्णांचा समावेश आहे.

सारांश

* बरे झालेली रुग्ण संख्या 13 हजार 478.

* उपचार सुरू असलेले रुग्ण 3365

* मृत्यू 231 एकूण रुग्ण संख्या 17 हजार 74

- Advertisment -

ताज्या बातम्या