Saturday, May 4, 2024
Homeनगरजिल्ह्यात करोनाचा विळखा घट्ट

जिल्ह्यात करोनाचा विळखा घट्ट

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यातील करोना संसर्गाचा विळखा आता घट्ट होण्यास सुरूवात झाली आहे. मंगळवारी जिल्ह्यात नव्याने 2 हजारांहून अधिक करोना रुग्ण समोर आले आहेत.

- Advertisement -

यात नगर शहरात उच्चांकी संख्या असून संगमनेर-राहाता तालुक्यात करोना रुग्णांचे द्विशतक झाले असून अकोले, पाथर्डी, नगर ग्रामीण, कोपरगाव आणि श्रीरामपूरमध्ये करोना बाधितांचे शतक झाले आहे. यामुळे जिल्ह्यात उपचार घेणार्‍या करोना रुग्णांची संख्या आता पावणे अकरा हजार झाली आहे.

जिल्ह्यात काल 1 हजार 347 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे करोना मुक्त झालेल्यांची संख्या 93 हजार 495 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण 88.61 टक्के असून काल नव्याने 2 हजार 20 करोना रुग्ण वाढले आहेत. यामुळे उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या 10 हजार 766 झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 763, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 860 आणि अँटीजेन चाचणीत 397 रुग्ण बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 294, अकोले 74, जामखेड 10, कर्जत 1, कोपरगाव 63, नगर ग्रामीण 48, नेवासा 8, पारनेर 22, पाथर्डी 37, राहता 19, राहुरी 26, संगमनेर 72, शेवगाव 37, श्रीरामपूर 19, कॅन्टोन्मेंट बोर्ड 31, मिलिटरी हॉस्पिटल 1 आणि इतर जिल्हा 1 अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 268, अकोले 33, जामखेड 6, कर्जत 3, कोपरगाव 38, नगर ग्रामीण 56, नेवासा 12, पारनेर 9, पाथर्डी 12, राहाता 146, राहुरी 19, संगमनेर 124, शेवगाव 12, श्रीगोंदा 5, श्रीरामपूर 65, कँटोन्मेंट बोर्ड 12, इतर जिल्हा 38 आणि इतर राज्य 2 अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत 397 जण बाधित आढळुन आले. मनपा 60, अकोले 54, जामखेड 2, कर्जत 1, कोपरगाव 5, नगर ग्रामीण 12, नेवासा 32, पारनेर 16, पाथर्डी 68, राहाता 49, राहुरी 45, संगमनेर 9, शेवगाव 16, श्रीगोंदा 5, श्रीरामपूर 21 आणि कॅन्टोन्मेंट बोर्ड 2 अशा रुग्णांचा समावेश आहे.

एकाच दिवसात 13 मृत्यू

गेल्या 24 तासांत जिल्ह्यात करोना बळींची संख्या आता 13 झाली आहे. सोमवारपर्यंत जिल्ह्यात करोनामुळे 1 हजार 242 जणांचा मृत्यू झाला होता. त्यात मंगळवारी 13 ची वाढ झाली. यामुळे करोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या आता 1 हजार 255 झाली आहे.

नगर मनपा 622, राहाता 214, संगमनेर 205, अकोले 161, पाथर्डी 117, नगर ग्रामीण 116, कोपरगाव 106, श्रीरामपूर 105, राहुरी 90, शेवगाव 65, नेवासा 52, पारनेर 47, भिंगार 45, अन्य जिल्हा 39, जामखेड 18, श्रीगोंदा 10, कर्जत 5, अन्य राज्य 2, लष्कर रुग्णालय 1 यांचा समावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या