Friday, May 3, 2024
Homeनगरजिल्ह्यात 603 रुग्ण, अन् आणखी आठ करोना बळी

जिल्ह्यात 603 रुग्ण, अन् आणखी आठ करोना बळी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यातील करोनाचा संसर्ग आता गुणकार पध्दतीने वाढण्यास सुरूवात झाली आहे. शनिवारी पुन्हा नव्याने 603 करोना बाधित रुग्ण समोर आले आहेत. यामुळे एकूण करोनाग्रस्तांची संख्या 16 हजार 508 झाली असून यात उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 3 हजार 228 इतकी आहे. यासह मृतांच्या सरकारी आकडेवारीत आठची वाढ झाल्याने करोना बळींची संख्या आता 226 झाली आहे.

- Advertisement -

दरम्यान जिल्ह्यात करोनामुक्तांच्या आकड्याने 13 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. करोनातून बरे झालेल्यांची संख्या आता 13 हजार 54 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे सध्या 79.08 टक्के इतके आहे. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 115, अँटीजेन चाचणीत 288 आणि खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 200 रुग्ण बाधित आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 82, संगमनेर 3, पाथर्डी 1, नगर ग्रामीण 2, कॅन्टोन्मेंट 2, पारनेर 7, राहुरी 3, कोपरगाव 6, जामखेड 1, कर्जत 1 आणि मिलीटरी ह़ॉस्पिटल 7 अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत काल 288 जण बाधित आढळुन आले.

यामध्ये, मनपा 50, संगमनेर 7, राहाता 25, पाथर्डी 16, नगर ग्रामीण 25, श्रीरामपुर 14, कँटोन्मेंट 6, नेवासा 20, श्रीगोंदा 14, पारनेर 16, अकोले 7, राहुरी 33, शेवगाव 12, कोपरगाव 25, जामखेड 12 आणि कर्जत 6 अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या 200 रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा 112, संगमनेर 7, राहाता 8, पाथर्डी 6, नगर ग्रामीण 30, श्रीरामपुर 7, कँटोन्मेंट 2, नेवासा 11, श्रीगोंदा 1, पारनेर 3, अकोले 2, राहुरी 3, शेवगाव 1, कोपरगाव 3 जामखेड 2 आणि कर्जत 2 अशा रुग्णांचा समावेश आहे.

445 घरी सोडले

शनिवारी 445 रुग्णांन करोनातून बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये, मनपा 184, संगमनेर 37, राहाता 17, पाथर्डी 17, नगर ग्रामीण 13, श्रीरामपूर 17, कॅन्टोन्मेंट 4, नेवासा 24, श्रीगोंदा 11, पारनेर 20, अकोले 16, राहुरी 7, शेवगाव 21, कोपरगाव 24, जामखेड 13, कर्जत 20 अशा रुग्णांचा समावेश आहे.

झेडपीतील तिसरा बळी

जिल्हा परिषदेत यापूर्वी करोनामुळे दोघांचा बळी गेलेला आहे. शनिवारी मूळ राज्य सरकारच्या सेवेत असणारा आणि आता समाज कल्याण विभागात प्रतिनियुक्तीवर असणार्‍याचा बळी गेला आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या वर्तुळात खळबळ झाली असून पुन्हा कर्मचार्‍यांच्या सुरक्षतेचा विषय ऐरणीवर आला आहे. यासह जिल्हा परिषदेत 13 कर्मचार्‍यांनी करोनावर मात केली आहे.

सारांश

* बरे झालेली रुग्ण संख्या 13 हजार 54

* उपचार सुरू असलेले रूग्ण 3 हजार 228

* मृत्यू 226

* एकूण रूग्ण संख्या 16 हजार 508

- Advertisment -

ताज्या बातम्या