Monday, August 17, 2026
Homeक्राईमAhilyanagar : बनावट दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; एजंटगिरी करणार्‍या दोघांना अटक

Ahilyanagar : बनावट दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; एजंटगिरी करणार्‍या दोघांना अटक

तीन दिवस कोठडी

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जिल्हा रूग्णालयातून बनावट दिव्यांग प्रमाणपत्रे काढून देण्याच्या आरोपावरून एजंटगिरी करणार्‍या दोघांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. दिलीप राजेंद्र आंधळे (रा. गिरीवाडी, ता. पाथर्डी) व जालिंदर ऊर्फ प्रेमकुमार अरूण वारे (रा. भुतकरवाडी, बालिकाश्रम रस्ता, अहिल्यानगर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे असून न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची (17 एप्रिलपर्यंत) पोलीस कोठडी सुनावली आहे.

- Advertisement -

दरम्यान, या प्रकरणात 15 संशयितांचा सहभाग निष्पन्न झाला असून त्यापैकी आतापर्यंत नऊ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. जिल्हा रूग्णालयातील काही कर्मचार्‍यांच्या संगनमताने कोणतीही वैद्यकीय तपासणी न करता, तसेच रूग्णालयात नोंद न करता थेट ऑनलाइन पोर्टलवर माहिती भरून बनावट दिव्यांग प्रमाणपत्रे तयार करण्यात येत असल्याचे चौकशीत उघड झाले आहे. या गैरप्रकाराचा फायदा घेत अनेकांनी विविध शासकीय योजनांचा लाभ घेतल्याचेही समोर आले आहे. दिव्यांग प्रमाणपत्र प्रणालीचा आयडी आणि पासवर्ड चोरून किंवा गैरवापर करून ही प्रमाणपत्रे तयार करण्यात आली असल्याचा आरोप आहे.

प्रारंभी या प्रकरणाचा तपास तोफखाना पोलीस ठाण्याकडे होता. त्यांनी सुरूवातीला तिघांना अटक केली होती. त्यानंतर तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. आर्थिक गुन्हे शाखेने आतापर्यंत तीन नोकरदारांसह चौघांना अटक केली होती. आता या प्रकरणात एजंट म्हणून काम करणार्‍या आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस उपअधीक्षक गणेश उगले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून अटक संशयित आरोपींकडून अधिक माहिती मिळविण्याचे काम सुरू आहे.

ताज्या बातम्या

Accident News : दूध टँकर व दुचाकीचा अपघात; एक ठार

0
अकोले |प्रतिनिधी| Akole तालुक्यातील लिंगदेव येथील ठाकरवाडी परिसरात दुचाकी (Bike) आणि दूध टँकरमध्ये (Milk Tanker) जोरदार धडक होऊन भीषण अपघात (Accident) होवून दुचाकीस्वार जागीच ठार...