Wednesday, October 9, 2024
Homeनगरनगरला प्रथमच महिला प्रधान जिल्हा न्यायाधीश

नगरला प्रथमच महिला प्रधान जिल्हा न्यायाधीश

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्याच्या प्रधान जिल्हा न्यायाधीशपदी न्यायाधीश पहिल्यांदाच महिला न्यायाधीशाची नेमणूक झाली आहे. धाराशिव येथून श्रीमती शेंडे नगरला बदलून आल्या आहेत. नगरचे प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर येरालगड्डा यांची अमरावती येथे बदली झाली. त्यांच्या जागी धाराशिव (उस्मानाबाद) येथून ए. एस शेंडे यांची बदली झाली आहे.

- Advertisement -

नगरच्या जिल्हा न्यायालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रधान जिल्हा न्यायाधीशपदी महिलेची नियुक्ती झाली आहे. 18 सप्टेंबरनंतर त्या सूत्रे स्वीकारतील. तसेच त्या शिर्डीच्या साईबाबा संस्थांनाच्या विश्वस्त समितीच्याही अध्यक्ष राहणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या