Friday, November 22, 2024
HomeनाशिकSant Gadge Baba GramSwachata Abhiyan : संत गाडगेबाब ग्रामस्वच्छता पुरस्कार सोहळ्याचे उद्या...

Sant Gadge Baba GramSwachata Abhiyan : संत गाडगेबाब ग्रामस्वच्छता पुरस्कार सोहळ्याचे उद्या आयोजन

जिल्ह्यातील ३० ग्रामपंचायतींचा समावेश

नाशिक | प्रतिनिधी
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींचा जिल्हास्तरीय पुरस्कार सोहळा शनिवारी (दि.५) पालकमंत्री दादाजी भुसेव राज्याचे अन्न नागरी व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ तसेच महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली.

कॉलेजरोडवरील गुरुदक्षिणा हॉल येथे शनिवारी सकाळी १० वाजता या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून या पुरस्कार वितरण सोहळ्यात जिल्ह्यातील ३० ग्रामपंचायतींना पुरस्कार देऊन गौखण्यात येणार आहे. या पुरस्कार सोहळ्यासाठी खा. राजाभाऊ बाजे, खा. डॉ. शोभा बच्छाव, खा. भास्कर भगरे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व विधानसभा व विधान परिषद सदस्य, विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी आदी मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे.

- Advertisement -

ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्य तसेच जीवनस्तर उंचावण्यासाठी शासनाच्या वतीने ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम’ स्पधा राबवण्यात येत आहे. ग्रामस्थांत स्वच्छतेची आवड निर्माण होण्यासाठी तत्कालीन ग्रामविकास मंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांनी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सुरू केले. यामुळे गावांमध्ये स्वच्छतेसाठी स्पर्धा लागली. या अभियानाला स्वच्छ भारत अभियानाची जोड मिळाल्याने गावे हागणदारीमुक्त झाली. संत गाडगेबाबा आमस्वच्छता अभियान अंतर्गत घर, परिसर स्वच्छतेतून समृद्धीकडे स्वच्छता, सजावट स्पर्धा, जागतिक हात धुवादिन, रस्ते दुरुस्ती, स्वच्छता, सफाई, स्वच्छ जनावरे, आदर्श गोठा, पाणी शुद्धता, सांडपाणी व्यवस्थापन यासंबंधी चांगले उपक्र म राबवण्यात येत आहेत.

यात शौचालय व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, पाणी गुणवता आणि पाणी व्यवस्थापन, घर, गाव परिसर स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता, स्मार्ट व्हिलेज, लोकसहभाग आणि सामूहिक स्वयंपुढाकारातून नावीन्यपूर्ण उपक्रम यामध्ये केलेल्या कामांचे मूल्यमापन करण्यात येऊन या निकषांच्या आधारे ग्रामपंचायतींची पुरस्कारांसाठी निवड करण्यात येते. जिल्ह्यातील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक तसेच तीन विशेष पुरस्कार देण्यात येतात. यामध्ये १) डॉ. बाबासाहेब अबिडकर पुरस्कार (पाणी गुणवत्ता व पाणी व्यवस्थापन), २) स्व. वसंतराव नाईक स्मृती पुरस्कार (सांडपाणी व्यवस्थापन) व ३) स्व. आबासाहेब खेडकर स्मृती पुरस्कार (शौचालय व्यवस्थापन) यांचा समावेश आहे.

पुरस्कारप्राप्त गावे
सन २०१८-१९ शिरसाणे (चांदवड) प्रथम, लोखंडेवाडी (दिंडोरी) द्वितीय, हनुमाननगर (निफाड) व बोरवट (पेठ) तृतीय विभागून, सन २०१९-२० गोंडेगाव (दिंडोरी) प्रथम, शिरसाणे (चांदवड) द्वितीय, शिवडी (निफाड) व नवे निरपूर (बागलाण) तृतीय विभागून. विशेष पुरस्कार कोटमगाव (नाशिक), धामणगाव (इगतपुरी) व हनुमाननगर (पेठ).

सन २०२०-२१ व २०२१- २२ (एकत्रित स्पर्धा) – पिंपळगाव बसवंत (निफाड) प्रथम, सुळे (कळवण) व नवे निरपूर (बागलाण) द्वितीय विभागून, शिरसाळे (इगतपुरी तृतीय. विशेष पुरस्कार ओझरखेड (दिंडोरी), खुंटेवाडी (देवळा), पाहचीबारी (पेठ), सन २०२२-२३ दहिंदुले(बागलाण), राजदेखाडी (चांदवड), माळवाडी (देवळा). विशेष पुरस्कार – अंदरसूल (येवला), आधार बु, (मालेगाव) पिंपळगाव बसवंत (निफाड).

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या