Tuesday, June 16, 2026
HomeनगरAhilyanagar : जिल्हा पोलीस दलातील पाच अधिकार्‍यांना पदोन्नती

Ahilyanagar : जिल्हा पोलीस दलातील पाच अधिकार्‍यांना पदोन्नती

एक पीआय, तर चौघे झाले एपीआय

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

राज्य पोलीस दलातील पदोन्नतीची प्रतीक्षा अखेर संपुष्टात आली असून राज्यभरातील 77 सहायक पोलीस निरीक्षकांना (एपीआय) पोलीस निरीक्षक (पीआय) पदावर, तर 488 पोलीस उपनिरीक्षकांना (पीएसआय) सहायक पोलीस निरीक्षक (एपीआय) पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. राज्याचे पोलीस महासंचालक सदानंत दाते यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. या निर्णयामुळे अनेक दिवसांपासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या अधिकार्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

- Advertisement -

या पदोन्नती प्रक्रियेत अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातील एक सहायक पोलीस निरीक्षक व चार उपनिरीक्षकांचा समावेश असून त्यांची पदोन्नतीसह जिल्ह्याबाहेर बदली करण्यात आली आहे. पदोन्नती मिळालेल्या अधिकार्‍यांमध्ये नितीन खंडागळे यांना सहायक पोलीस निरीक्षक पदावरून पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. त्यांची बदली छत्रपती संभाजीनगर शहर येथे करण्यात आली आहे. तसेच उपनिरीक्षकांमध्ये विनोद परदेशी, जयेश गांगुर्डे, अजिनाथ कोठाळे आणि समीर अभंग यांचा समावेश आहे. पदोन्नतीनंतर विनोद परदेशी यांची नवी मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे. जयेश गांगुर्डे आणि अजिनाथ कोठाळे यांची नाशिक परिक्षेत्रात बदली करण्यात आली असून समीर अभंग यांची पुणे शहर पोलीस दलात नियुक्ती करण्यात आली आहे.

25 मे 2004 नंतर शासन सेवेत रूजू झालेल्या सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षकांना त्यांच्या मूळ सेवाज्येष्ठतेनुसार ही पदोन्नती देण्यात आली आहे. पोलीस दलातील प्रशासकीय प्रक्रियेनुसार ही पदोन्नती करण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, पदोन्नती मिळालेल्या अधिकार्‍यांवर सहकारी अधिकारी व कर्मचार्‍यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

ताज्या बातम्या

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा; आदित्य ठाकरे म्हणाले,...

0
मुंबई । Mumbai महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत मिळत असून, 'ऑपरेशन टायगर' या नव्या राजकीय समीकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. ठाकरे गटाचे...