Sunday, September 15, 2024
Homeनगरगुड न्यूज : जिल्हा पोलीस दलातील 50 हवालदार झाले सहाय्यक फौजदार

गुड न्यूज : जिल्हा पोलीस दलातील 50 हवालदार झाले सहाय्यक फौजदार

अहमदनगर|Ahmedagar

- Advertisement -

जिल्हा पोलीस दलात (District Police Force) पोलीस हवालदार (Police constable) पदावर काम करणार्‍या 50 अंमलदारांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (Assistant Sub-Inspector of Police) पदावर पदोन्नती मिळाली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील (District Superintendent of Police Manoj Patil) यांनी तसे आदेश काढले आहेत. बर्‍याच काळापासून प्रतीक्षेत असलेल्या पोलीस अंमलदारांना पदोन्नती मिळाल्याने पोलीस दलात उत्साहाचे वातावरण आहे.

मिळालेल्या पदोन्नतीमध्ये स्थानिक गुन्हे शाखा (LCB), पोलीस मुख्यालय (Police Headquarters), साई मंदिर सुरक्षा शिर्डी (Sai Temple Security Shirdi), नियंत्रण कक्ष (Control Panel), अर्ज शाखा (Application Branch), श्रीरामपूर उपविभागीय कार्यालय (Shrirampur Sub-Divisional Office), दहशतवाद विरोधी पथक (Anti-terrorism squad), जिल्हा विशेष शाखा (District Special Branch) व इतर सर्वच पोलीस ठाण्यातील अंमलदारांचा समावेश आहे. पदोन्नती मिळालेल्या पोलीस अंमलदारांचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक (श्रीरामपूर) दिपाली काळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी अभिनंदन केले.

यांना मिळाली पदोन्नती

बाळासाहेब मुळीक, विष्णू घोडेचोर, दादासाहेब काकडे, विलास जगताप, अरविंद गरड, बाबासाहेब गुंजाळ, आप्पा दिवटे, शैलेश उपासने, जगदीश पोटे, जाकीर शेख, सलाउद्दीन शेख, देवराव ढगे, अंबर गवांदे, बबन साळवे, तुळशीराम सातपुते, प्रमोद पवार, रमेश वराट, अण्णा डाके, अर्जुन ढाकणे, प्रशांत भराट, सय्यद मोहम्मद युसुफ कादिर, मारूती कोळपे, बबन माघाडे, निवृत्ती शिर्के, शंकर आहेर, अशोक आंधळे, जयसिंग आव्हाड, दत्तात्रय बडे, नरसिंह शेलार, लक्ष्मण औटी, भाऊसाहेब पगारे, साहेबराव वाकचौरे, अमरनाथ गवसणी, मुकूंद कणसे, संजय गवळी, लक्ष्मण पवार, सुरेश टकले, अशोक जाधव, हबीब अब्दुल्ला हबीब, सुभाष दैमिवाल, भरत धुमाळ, दीपक बडे, नितीन सप्तर्षी, बाबासाहेब बालसिंग, मुरलीधर आव्हाड, विलास घाणे, मिबाँ पापाभाई पठाण, कैलास बोठे, मनोहर गावडे, दादासाहेब गरड.

- Advertisment -

ताज्या बातम्या