Tuesday, March 25, 2025
HomeनाशिकNashik News : 'जीआयएस' यंत्रणा अंतिम करा - डॉ. गेडाम

Nashik News : ‘जीआयएस’ यंत्रणा अंतिम करा – डॉ. गेडाम

तयारी सिंहस्थाची : नाशिक व त्र्यंबकेश्वरच्या विकासकामांचा आढावा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (Simhastha Kumbh Mela) पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या माध्यमातून तयार होणारी जीआयएस (ग्लोबल इन्फॉर्मेशन सिस्टिम) प्रणाली अंतिम करावी. ही यंत्रणा अद्ययावत, वापरण्यास सुलभ आणि सोप्या पद्धतीने तयार करावी, असे निर्देश नाशिक विभागीय महसूल आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम (Praveen Gedam) यांनी दिले.

- Advertisement -

जिल्हाधिकारी कार्यालयातील (Collector’s office) मध्यवर्ती सभागृहात आयोजित सिंहस्थ कुंभमेळा आढावा बैठकीत महसूल आयुक्त डॉ. गेडाम बोलत होते. यावेळी नाशिक व त्र्यंबकेश्वरच्या विकासकामांचा आढावा सादर करण्यात आला.सिंहस्थासाठीचे आगामी काळातील नियोजन पाहता वाहनतळ अत्याधुनिक आणि सुसज्ज असावीत. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, महानगरपालिकेने अभ्यास करून नियोजन करावे. कुंभमेळ्यासह सर्व कामे गुणवत्तापूर्ण असतील याची दक्षता प्रत्येक विभागाने घ्यावी.

गोदावरी नदीचे (Godavari River) प्रदूषण थांबविण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी पात्राची नियमित पाहणी करावी. तसेच नदीपात्रात प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई करावी. याबाबत नियमितपणे आढावा घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आगामीकुंभमेळ्याच्या नियोजनासाठी जीआयएस यंत्रणेचा वापर करावा, असे निर्देश यापूर्वी विभागीय महसूल आयुक्त डॉ. गेडाम यांनी दिले होते. त्यानुसार आजच्या बैठकीत महानगरपालिका आयुक्त श्रीमती खत्री यांनी सादरीकरण केले. त्यात काही सुधारणा करण्याच्या सूचना विभागीय महसूल आयुक्त डॉ. गेडाम यांनी दिल्या.

जीआयएस यंत्रणेच्या (GIS Systems) वापरासाठी निश्चित अशी कार्यपद्धती तयार करावी. त्यात सर्व विभागांचा समावेश असावा. त्यावर उपलब्ध होणारा डाटा कायमस्वरूपी संरक्षित करून ठेवावा. सीसीटीव्ही कार्यान्वित करताना व्हिडिओ विश्लेषकाचावापर करावा, आदी सुचना दिल्या. या बैठकीत नाशिक जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री, सहाय्यक जिल्हाधिकारी अर्पित चौहान, ओमकार पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

वरिष्ठ अधिकारी देणार प्रयागराजला भेट

प्रयागराज (उत्तर प्रदेश) येथे सुरू झालेल्या कुंभमेळ्यातील पायाभूत सोयीसुविधा, भाविकांना उपलब्ध करून दिलेल्या सुविधांच्या पाहणीसाठी जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी लवकरच प्रयागराजचा दौरा करतील. या दौऱ्यातून प्रयागराज जिल्हा प्रशासनाने केलेले नियोजन, भाविकांना उपलब्ध करून दिलेल्या सुविधा यांची माहिती होईल. त्याचा उपयोग आगामी कुंभमेळ्यासाठी करता येईल, असेही आयुक्त डॉ. गेडाम यांनी सांगितले.

१७ ला मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विकासकामांना कालावधी कमी पडू नये, यासाठी मुख्यमंत्री स्तरावरुन येत्या १७ तारखेला सिंहस्थ आढावा बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीला सर्वच विभागाचे प्रमुख आपल्या विभागाद्वारे प्रस्तावित विकासकामांचे आढावे सादर करणार आहेत. त्यासाठीच्या तातडीच्या कामांच्या क्रमवारीनुसार नव्याने आराखडे तयार करण्याच्या सूचना डॉ. गेडाम यांनी विभागप्रमुखांना दिल्या. या बैठकीत विकास कामांसाठीच्या निधीचे नियोजन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...