पूर्वी गिर्यारोहण, दुर्गभ्रमंती, प्रस्तरारोहण, घाटवाटा शोधणे आणि फिरणे, गडकिल्ले दर्शन हे फक्त आवडीचे उपक्रम होते. यात अनुभवी लोक जास्त होते आणि नवीन जाणारे लोकसुद्धा सहसा अनुभवी गिर्यारोहकांसोबत किंवा अयोजकांसोबतच जात असत. आता मात्र, इंंटरनेट आणि ब्लॉगर्समुळे आज नवनवीन जागा एका क्लिकवर सहजच पाहायला मिळतात. तिथपर्यंत कसे जावे याची माहितीदेखील घरबसल्या मिळत असल्याने पर्यटन सोपे झालेय. त्यातही सेल्फी आणि रील तयार करून प्रसिद्ध व्हायच्या भावनेने हौशी पर्यटकांची संख्या वाढली आहे. यातीलच काही लोक अवघड ठिकाणी जाऊन हरविण्याचे, कुठेतरी घसरून पडण्याचे किंवा कधीकधी गतप्राण होण्याचे प्रमाणदेखील वाढले आहे. अशावेळी बचाव करणार्या संंस्था मदतीला तत्पर असतात. अशा गिर्यारोहक संस्थांचा हा थोडक्यात परिचय…
पूर्वी गिर्यारोहण, दुर्गभ्रमंती, प्रस्तरारोहण, घाटवाटा शोधणे आणि फिरणे गडकिल्ले दर्शन हे फक्त आवडीचे उपक्रम होते. यात अनुभवी लोक जास्त होते आणि नवीन जाणारे लोक पण सहसा अनुभवी गिर्यारोहकांसोबत किंवा आयोजकांसोबतच जात असे. परंतु,इंटरनेटमुळे आणि ब्लॉगर्स मुळे आज नवनवीन जागा 1 क्लिकवर पाहायला मिळतात आणि कसे जावे याची माहिती देखील मिळाल्यामुळे हल्ली पर्यटन सोपे झालेय आणि त्यात सेल्फी आणि रील तयार करून प्रसिद्ध व्हायच्या भावनेने हौशी पर्यटक जास्त वाढले आहेत.
यातीलच काही लोक अवघड ठिकाणी जाऊन हरविण्याचे,कुठेतरी घसरून पडण्याचे किंवा कधी कधी गतप्राण होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. अशाप्रसंगी ज्या बचाव संस्था धावून जातात आज त्यांच्याबद्दल जाणून घेऊया.
साधारण संपूर्ण राज्यात सर्व जिल्ह्यांमध्ये डोंगर बचाव आणि शोधपथक कार्यरत असून त्या MMRCC (MAHARASHTRA mountaineering rescue co-ordination centre) च्या माध्यमातून त्या सर्व एकमेकांशी जोडलेल्या आहेत.
कधीही कुठेही अपघात झाला की MMRCC च्या ग्रुप वर त्याबद्दल माहिती टाकली जाते आणि अपघात झालेल्या जागेपासून जवळ असणारी टीम सर्वात आधी प्रतिसाद देते. अशीच आपल्या नाशिकमधील संस्था – NASHIK CLIMBERS AND RESCUERS ASSOCIATION ही नोंदणीकृत सामाजिक संस्था असून, मुख्यत्वे करून डोंगरात होणार्या अपघातांमध्ये शोध आणि बचाव मोहीम राबविणे आणि इतर वेळी गडकिल्ल्यांच्या पायथ्याला राहणार्या युवकांना बेसिक ट्रेनिंग देण्याचे काम करते.
कधीही कुठेही अपघात झाला तर ते सगळ्यात आधी त्या त्या गावातल्या स्थानिक लोकांना समजते आणि सर्वात आधी पोहचणारेही तेच लोक असतात, अशा प्रसंगी जर त्यांना बेसिक रेस्क्यू पद्धती, प्रथमोपचार पद्धती माहीत असतील आणि थोडे एक्विपमेंट असतील तर जखमी व्यक्तीला वेळेवर उपचार मिळून तो जास्त सेफ होऊ शकतो. या उद्देशाने संस्थेच्या माध्यमातून असे प्रशिक्षण वर्ग चालवले जातात आणि निधी संकलन झाल्यास सर्व गडकिल्ल्यांच्या पायथ्याला असलेक्या गावांमध्ये बेसिक कीट देण्याचे मानस आहे.
संस्थेमध्ये-certified mountineers, certified first aiders, communication experts असून नवनवीन एक्विपमेंटच्या वापरांबद्दल ट्रेनिंग घेत असतात.
आता रेस्क्यूचे काम कसे चालते याबद्दल जाणून घेऊ यारेस्क्यू कॉल हा कधी येईल कितीला येईल सांगू शकत नाही. त्यामुळे या संघटना वर्षभर सरावात असतात.
या सरावात
- वजन घेऊन चालणे, 2. दिशा शोधणे, 3.टेक्निकल रेस्क्यू येऊ शकतो. त्यासाठी प्रस्तरारोहण सराव करणे, 4. सुळके चढाई, 5. स्ट्रेचर एक जागेवरून दुसर्या जागेवर रोपच्या साहाय्याने ने-आण करणे, 6. रेस्क्युअरला खालून वर आणि वरून खाली पोहचवणे, 7. डोंगरात होणार्या अपघातासंदर्भात प्रथमोपचार आणि बांडेजिंग सराव, 8. जखमी व्यक्तीला कसे हाताळावे, 9. मोबाईल नेटवर्क नसलेल्या भागात संपर्क यंत्रणा सक्रिय करणे, 10. मॉक ड्रिल या सर्व गोष्टी समाविष्ट असतात.
डोंगरात होणार्या अपघातांचे साधारण 4 भागात वर्गीकरण केले गेलेले आहेत
- वाट चुकून हरवणे आणि पुढे वाट न सापडणे : यात एखादा व्यक्ती किंवा समूह एखाद्या भागात जाऊन धुक्यामुळे, दाट जंगलामुळे, पावसामुळे किंवा दिशेचा अंदाज न आल्यामुळे दुसरीकडे जातात आणि त्यांना समजते की आपण चुकलो आहोत, आणि मध्ये कुठे मोबाईलला नेटवर्क आले तर ते कोणाला तरी कळवतात. याबाबत किंवा आरडाओरड करून गावात आवाज पोहचवण्याचा प्रयत्न करतात.
- हरवून कुठेतरी अवघड ठिकाणी जाऊन अडकणे :यात एखादा व्यक्ती किंवा समूह वर दिलेल्या कारणांमुळे भरकटतो आणि अशा ठिकाणी जाऊन अडकतो जिथून पुढे जाणे शक्य नसते आणि मागे जायची हिंमत निघून गेलेली असते. यात ग्रुपमधील एखादा व्यक्ती धाडस करून मागे येऊन नेटवर्क मिळाले तर याबाबत माहिती देतो किंवा जवळच्या गावात जाऊन झालेल्या परिस्थितीबद्दल सांगतो.
- घसरून पडणे किंवा काही अपघात होणे : यात एखादा व्यक्ती किंवा समूहातील सदस्य कुठेतरी पाय घसरून पडतो आणि जखमी होतो, अवघड ठिकाणी सेल्फी काढायच्या नादात एकदम कडेला जाऊन उभा राहतो आणि पडतो, धबधब्यात खेळायला जाऊन पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दुसर्या बाजूला अडकून पडतो. मधमाशी, साप किंवा एखाद्या हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्यात जखमी होतो.
- अपघात होऊन गतप्राण होणे : यात एखादी व्यक्ती किंवा समूहातील सदस्य उंचावरून पडून मृत्युमुखी पडतो. पाण्यात बुडून मृत्यू होतो. धबधब्यात वाहून निघून जातो प्रवाहात किंवा आत्महत्या करण्यासाठी कुठून तरी उडी मारलेली असते.
यात जर व्यक्ती गतप्राण झाली असेल तर थोडा वेळ मागे पुढे होऊ शकतो, पण जर कोणी जखमी असेल किंवा अवघड ठिकाणी अडकलेला असेल तर थोडाही वेळ व्यर्थ न घालवता निघायचे असते. कारण 1-1 मिनिटात परिस्थिती बदलत असते. रेस्क्यू टीमचे मुख्य 4 विभाग असतात - फर्स्ट रिस्पॉण्डर : माहिती मिळाल्या मिळाल्या जे रेस्क्युअर सर्वात पहिले ठरलेल्या ठिकाणी जमा होतात आणि पुढे निघतात हे या टीममध्ये असतात. यात शक्यतो टीममधील सगळ्यात जास्त तज्ज्ञ आणि अनुभवी लोकांचा समावेश असतो ही टीम फक्त शोध घेत पुढे निघते आणि रस्ते,वातावरण, भौगोलिक माहिती आणि शोध लागल्यावर जखमी व्यक्तीची परिस्थिती याबद्दल मागे माहिती पाठवत असते, यांच्यासोबत काही स्थानिक गावकरी पण असतात.
- बॅकअप टीम : पहिल्या टीमच्या नंतर जमा होणारी आणि निघणारी म्हणून बॅकअप टीम असते, तुलनेत यांच्याकडे जास्त वजन असते. पहिल्या टीमला लागणारे अन्नपाणी, जखमीला उचलण्यासाठी लागणारे एक्स्ट्रा एक्विपमेंट,कम्युनिकेशन बॅकअप असे सगळे घेऊन ही टीम मुव्हमेंट करते, यांच्यासोबत पण काही स्थानिक लोक असतात.
- सपोर्ट टीम : अपघात झालेंल्या डोंगराच्या पायथ्याला किंवा दरीच्या किनार्यावर किंवा धबधब्याच्या सुरुवातीला 1 तात्पुरते कमांड सेंटर बनवले जाते आणि तिथून सर्व मोहिमेवर लक्ष ठेवले जाते, तिथे ही स्मार्ट टीम तयार होऊन बसलेली असते आणि पुढे गेलेल्या टीमने मागणी केल्यास ही टीम तात्काळ रवाना होते. यांच्यासोबत पोलीस प्रशासन वनविभाग किंवा इतर सरकारी यंत्रणा आणि पत्रकार बंधू असतात कमांड सेंटरला.
- कम्युनिकेशन टीम : ही टीम प्रत्यक्ष फिल्डवर नसली तर फार महत्वाची टीम असते, सर्व टीममध्ये कम्युनिकेशन डिव्हाइसेस असतात आणि डिव्हाईसच्या माध्यमातून सगळे सदस्य कम्युनिकेशन टीमच्या संपर्कात असतात आणि रेस्क्यू च्या सर्व सूचना त्यावरूनच दिल्या जातात.
अपघात झाल्यावर सर्व प्रथम आपल्या रेस्क्युअर्सला संपर्क करणे. टीम निघायच्या आधी स्थानिक पोलीस,जिल्हा आपत्ती विभाग आणि वनविभागाला माहिती देऊन टीम निघणार आहे हे कळविणे. टीम निघाल्यावर पुढे त्या त्या गावात माहिती देणे. आणि मग कमांड सेंटरच्या माध्यमातून सगळ्या मोहिमेवर लक्ष ठेवणे हे ही टीम करते. वय झाल्यामुळे किंवा प्रत्यक्ष फिल्डवर जायला वेळ देऊ शकत नाही पण रेस्क्यूच्या कामात मदत करायची आहे अशी भावना असलेले काही सदस्य या टीम मध्ये सहभागी होतात.
घटनेची माहिती मिळाल्यावर दोन टीम कामाला लागतात त्यात एक असते कम्युनिकेशन टीम आणि दुसरी असते फर्स्ट रिस्पॉण्डर टीम रिस्पॉण्डर टीम मधील सदस्य झालेल्या घटनेची पूर्ण माहिती घेऊन तिथल्या भौगोलिक परिस्थितीचा आढावा घेते, अपघाताच्या स्वरूपानुसार काय काय एक्विपमेंट न्यावे लागेल त्याची लिस्ट करते आणि फॉरवर्ड टीममध्ये कोण आणि किती लोक जातील हे ठरवतेयाच दरम्यान कम्युनिकेशन टीम आपल्या सर्व सदस्यांशी संपर्क करून जे जे येत आहेत त्यांना बोलवण्याचे नियोजन करते. तसेच, सरकारी यंत्रणांना याबाबत सूचित करते आणि काही प्रक्रिया असल्यास पार पडते.
संपूर्ण वर्षभर रेस्क्यू टीमच्या सदस्यांच्या बॅग भरलेल्या असतात ज्यात त्यांना लागणारे महत्वाचे सामान असते, त्यामुळे कधीही फोन आला की त्यात खाणे आणि पाणी घेऊन हे निघतात.
सगळ्यात आधी जी टीम निघते ती फर्स्ट रिस्पांडर फॉरवर्ड टीम असते. यात परिस्थितीनुसार गरजेचे एक्विपमेंट, जखमी व्यक्तीसाठी लागणारे बचाव साहित्य असते आणि कमीत कमी वजन असते जेणेकरून ते कमी वेळेत अपघातग्रस्त व्यक्ती पर्यंत पोहचेल. ही टीम आपला आपला मार्ग स्वतः तयार करत जाते. जंगलमधून आणि मार्किंग करत जाते, अपघातग्रस्त व्यक्ती सापडल्यावर त्याबद्दल मागे माहिती देते आणि गरजेचा प्रथमोपचार करून जखमीला सुरक्षित ठिकाणी हलविण्याचा प्लॅन तयार करते. त्यामागून दुसरी टीम निघते बॅकअप टीम ज्यांच्याकडे अतिरिक्त साठा असतो सर्व गोष्टींचा.
रेस्क्यू किंवा रिकव्हरी किती वेळ चालेल याचा अंदाज बांधलेला असतो पण निसर्गात परिस्थिती कधी कधी बदलते आणि वेळ वाढतो. डोंगरात पडलेला व्यक्ती अशा ठिकाणी असतो जिथे वाट नसते तेव्हा वाट तयार करत करत यावे लागते, कधी कधी पाण्याचा प्रवाह जास्त असतो त्यामुळे वाट बदलावी लागते, अश्या अनेक गोष्टींमुळे वेळेचे नियोजन कधी कधी गडबडते त्यामुळे बॅकअप टीम मध्ये सर्व गोष्टी अतिरिक्त स्वरूपात असतात आणि कम्युनिकेशन टीम या दोन्ही टीम च्या संपर्कात असतात.
या सर्वांच्या पाठोपाठ जे सदस्य लांबून किंवा उशिरा येतात ते बेस स्टेशनला म्हणजे जिथे अपघात झालाय त्या ठिकाणी 1 कमांड सेंटर बनवले जाते जिथून सर्व कामाच्या हालचाली होतात. त्या ठिकाणी जमा होऊन सपोर्ट टीम म्हणून बसून राहतात. पुढे गेलेल्या टीममधून मागणी झाल्यास ही टीम पुढे निघते नाहीतर शेवटपर्यंत तिथेच थांबते. जखमी व्यक्तीपर्यंत पोहचल्यावर त्याला प्रथमोपचार करून सुरक्षित खाली आणायचा प्लॅन केला जातो. चालत येण्यासारखी जागा असेल स्ट्रेचर उचलून आणतात आणि अवघड जागा असेल जिथे चालू शकत नाही तिथे रोप सेटअप लावून मुव्हमेंट केली जाते, यात C pulley किंवा Z pulley सेटअपचा वापर केला जातो आणि त्यानुसार अपघातग्रस्तला खाली आणून पोलीस प्रशासनाला सुपूर्द केले जाते.
घटनेची माहिती मिळाल्यापासून ते मोहीम पूर्ण होऊन त्याचा रिपोर्ट तयार करून शासन दरबारी देईपर्यंत सर्व टीम अॅक्टिव्ह असतात आणि हे सगळे झाले की संपूर्ण एक्विपमेंट चेक करून काऊंट करून मोहीम संपवून सदस्य आपआपल्या घरी रवाना होतात.
डोंगरात शोध आणि बचाव मोहीम राबवण्यासाठी जे तांत्रिक शिक्षण लागते ते संपूर्ण भारतात फक्त 5 ठिकाणी शिकविले जाते त्या संस्था खालीलप्रमाणे.
- Nehru Institute of Mountaineering
उत्तरकाशी
2.National Institute of Mountaineering and Adventure sports
अरुणाचल प्रदेश - Jawahar Institute of Mountaineering
श्रीनगर - Himalayan Institute of Mountaineering
दार्जिलिंग - Atal Bihari Vajpayee Institute of Mountaineering and Allied Sports
मनाली
या सर्व प्रशिक्षण संस्था केंद्र शासनाच्या अखत्यारीत काम करतात आणि रक्षा मंत्रालय यावर लक्ष ठेऊन असते आणि रक्षा मंत्रालयाकडून प्रशिक्षक वेळोवेळी संस्थांना दिले जातात.हा साधारण 25 ते 30 दिवसांच्या निवासी प्रशिक्षण वर्ग असतो आणि संपूर्ण भारतात फक्त 5 संस्था आणि प्रचंड विद्यार्थी संख्या यामुळे 1 ते 2 वर्ष इथे नंबर लागत नाही.
प्रथमतः Basic Mountaineering Courseत्यानंतर Advance Mountaineering हे कोर्स केल्यानंतर आपणsearch and rescue चा कोर्स करू शकतो तेही आधीच्या दोन्ही कोर्स मध्ये A grade मिळवलेला असेल तरच.
First aid चे प्रशिक्षण भारतात redcross आणिst.johns ambulance या दोन संस्था देतात आणि दर 3 वर्षांनी ते परत करावे लागते.
कम्युनिकेशन मध्ये walke talkie हे कमी रेंजचे उपकरणे परवानामुक्त असतात पण लाँग रेंज वापरासाठी HAM Radio लागतात आणि त्यासाठी त्याचे प्रशिक्षण घेऊन परीक्षा देऊन परवाना घ्यावा लागतो.हे सर्व प्रशिक्षण पूर्ण करून संस्थेसोबत रोज सराव करून 1 व्यक्ती उत्तम रेस्क्युअर बनतो आणि सह्याद्री किंवा हिमालयात गरज पडेल तेव्हा लोकांना वाचवण्यासाठी जातो.
शोध आणि बचाव मोहिमांमध्ये मुख्य करून खालील एक्विपमेंटचा वापर होतो
- Static and dynamic rope, 2. Mountaineering hardware like harness, arabineer, descender,ascender, pulleys, 3. Different types of stretcher, Folding stretcher, Roller stretcher, Spine board, 4.First aid kit, 5. Victim bag, 6. Communication devices, 7. Mega phone, 8. Search lights, 9. Navigation devices, 10. Advance equipments
रेस्क्यू करणार्या सर्व संस्था या खासगी असतात आणि हे सर्व काम हे सेवा भावनेने सर्व सदस्य करतात आणि याच्या कुठलाही मोबदला सरकार किंवा स्थानिक प्रशासन देत नाही. येणारा एकही सदस्य यातून काही आर्थिक फायदा होईल या भावनेने काम करत नाही आणि तसे काही मिळतही नाही. जखमीच्या परिवारातले सदस्य संस्थेला कधी कधी या संस्थांना दान देतात आणि थोडी मदत मिळते.
या संपूर्ण कामात स्थानिक लोकांचा खूप मोठा हात असतो आणि प्रत्येक वेळी हे स्थानिक गरीब लोक मदतीला धावून येतात. सरकारने अश्या रेस्क्यू टीमकडे लक्ष देऊन त्यांना निधी असेल किंवा सरकारी योजनेतून एक्विपमेंट पुरवठा असेल, ओळखपत्र असतील किंवा विमा संरक्षण असे काहीतरी करून अधिक सक्षम करण्याची गरज आहे. तसेच सर्व नागरिकांना आवाहन की आपणही अश्या रेस्क्यू संघटनांना जोडले जायचा प्रयत्न करा म्हणजे वेळप्रसंगी आपली मदत होईल अपघात झाल्यावर सर्वात आधी स्थनिक लोक पोहचतात त्यामुळे त्यांना बेसिक रेस्क्यू ट्रेनिंग देऊन गावोगावी आणि गडकिल्ल्यांच्या पायथ्याला सुसज्ज अशा Quick Response Team बनवण्याचा संस्थेचा मानस आहे.
संकल्पना
- गावातील स्थानिक युवकांना रेस्क्यू, रिकव्हरी आणि प्रथमोपचाराचे बेसिक ट्रेनिंग देणे
- अपघात होणार्या सर्व ठिकाणी अशा QRT बनवून त्यांना वेळोवेळी प्रशिक्षित करणे.
- अपघात होणार्या आणि गर्दी होणार्या सर्व ठिकाणी बेसिक एक्विपमेंटचा साठा असणे जेणेकरून वेळ पडेल तेव्हा ते वापरून एखाद्याचा प्राण वाचवला जाऊ शकतो.
- निलेश पवार, खजिनदार Nashik Climbers and Rescuers Association सह्याद्री मित्र संमेलन आयोजक समिती
संस्थेची माहिती Nashik Climbers and Rescuers Association
अध्यक्ष – दयानंद कोळी. उपाध्यक्ष – किरण वाकचौरे, सचिव – जयवंत कोकणी - डोंगरात अपघात झाल्यास MMRCC हेल्पलाईन क्रमांक 98333 94047, राहुल मेश्राम – 94234 76044, दयानंद कोळी
निलेश पवार गिर्यारोहक