मुंबई / प्रतिनिधी Mumbai
राज्यातील एसटीच्या ८३ हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी प्रत्येकी १० हजार रुपये सानुग्रह अनुदान, पात्र कर्मचाऱ्यांना १२ हजार ५०० रुपये सण उचल आणि महागाई भत्ता ५८ टक्क्यांवरून ६० टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी गुरुवारी येथे दिली .
एसटी महामंडळातील विविध कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत सरनाईक यांनी वरील निर्णय जाहीर केले. या निर्णयामुळे महामंडळावर सुमारे १६० कोटी रुपयांचा आर्थिक भार पडणार असल्याचे सरनाईक यांनी सांगितले.
एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करणारे निर्णय घोषित केले. एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन अथवा करू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.




