अरुणा सरनाईक
लक्ष्मी पूजनाशी निगडीत बर्याच कथा सांगितल्या जातात. देवीची अनेक रुपे सांगितली जातात. वैकुंठात महालक्ष्मी, स्वर्गात स्वर्गलक्ष्मी, पाताळात नागलक्ष्मी, राजप्रसादात राजलक्ष्मी तर गृहस्थाघरी गृहलक्ष्मी, गायीत ती सुरभी झाली, यज्ञात दक्षिणा क्षीरसागर म्हणजे समुद्राची कन्या झाली. कमला, श्रीरूपा, चंद्राची शोभा बनली. मात्र ती भोळी नाही. ती प्रयत्नशील, उद्योगशील माणसाला प्रसन्न होते. ती स्वयं प्रयत्नरुपी आणि उद्योगरुपी आहे. लक्ष्मीप्राप्तीने म्हणजे संपन्नता आली तरी माणसाने उन्मत्त होऊ नये. कारण उन्मत्ततेत अध:पात असतो. विनम्रतेत उत्कर्ष, वाढ असते. हे आपल्या संस्कृतीने वारंवार सांगितले आहे.
वाळीचा स्वत:चा एक गंध असतो, जो वातावरणात बर्याच आधीपासून अस्तित्वात असतो. त्या दिवसातल्या एखाद्या पहाटे उठून जरा बाहेर फेरफटका मारला तरी आपल्याला दिवाळी जवळ आल्याची चाहूल वातावरणातील गंधातून लागते. या अश्विन कार्तिकाचे सारे वागणेच मनोवेधक. किंचित रेंगाळलेली उष्ण उन्हं तर कुठे थंडीची कोवळी शीतलहर. नवरात्री संपल्यावर 15 दिवसांत हा सण येतो. देवीच्या अस्तित्वाने भारलेल्या वातावरणात पुन्हा एक आदिमातेचे पूजन हे लक्ष्मीपूजन म्हणून केले जाते. पहाटेच्या धुसर वातावरणात सूर्योदयापूर्वी उठून स्नानादि काम करून (अभ्यंगस्नान) नरकचर्तुदशी साजरी केली जाते. आमच्या लहानपणी नरकचर्तुदशीला जर सूर्यादयापूर्वी स्नान नाही झाले तर नरकात जाणे निश्चितच असेच आमच्या मनावर बिंबवले जायचे आणि ते खरेही वाटायचे हो.
श्री लक्ष्मीदेवीचे दर्शन आपल्याला आपल्या प्राचीन ऋग्वेद ग्रंथात होते. लक्ष्मीदेवीला प्रिय असलेल्या श्रीसूक्ताचा उल्लेख ऋग्वेदामध्ये आहे. यामध्ये तिला श्रीदेवी या नावाने संबोधले आहे. श्री म्हणजेच लक्ष्मी होय. याहीव्यतिरिक्त श्रीसूक्तात तिला विविध नावाने आवाहन केलेले आहे. देवीदेवतांच्या अनेक सुतांमध्ये श्रीचा अर्थ संपन्नता, समृद्धी, वैभव असा दिलेला आहे. याशिवाय नदी रुपातील अवतार, वृक्षावतार इत्यादी. असेही म्हणता येईल की, देवीला प्रिय असलेल्या कोणत्या ना कोणत्या रूपात देवीचे अस्तित्व आहेच. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिताः असा देवीसुक्तात श्लोक आहे. आई जशी आपल्या मुलांची काळजी घेते तशी देवी आपल्या भक्तांची काळजी घेते. तिचे वास्तव्य आपल्या घरातही आहे. आपण ज्या रूपात तिचे स्मरण करतो त्या स्वरुपात ती आपल्यावर कृपा करते, असे मानले जाते.
लक्ष्मीपूजनाशी निगडीत बर्याच कथा सांगितल्या जातात. देवीची अनेक रूपे सांगितली जातात. वैकुंठात महालक्ष्मी, स्वर्गात स्वर्गलक्ष्मी, पाताळात नागलक्ष्मी, राजप्रसादात राजलक्ष्मी तर गृहस्थाघरी गृहलक्ष्मी, गायीत ती सुरभी झाली, यज्ञात दक्षिणा क्षीरसागर म्हणजे समुद्राची कन्या झाली. कमला, श्रीरूपा, चंद्राची शोभा बनली. मात्र ती भोळी नाही. ती प्रयत्नशील, उद्योगशील माणसाला प्रसन्न होते. ती स्वयं प्रयत्नरुपी आणि उद्योगरुपी आहे. लक्ष्मीप्राप्तीने म्हणजे संपन्नता आली तरी माणसाने उन्मत्त होऊ नये. कारण उन्मत्ततेत अध:पात असतो. विनम्रतेत उत्कर्ष, वाढ असते, हे आपल्या संस्कृतीने वारंवार सांगितले आहे. वेळोवेळी निरनिराळी उदाहरणे देऊन, कधी कथांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवलेले आहे. त्याचप्रमाणे जिथे स्वच्छता तिथे लक्ष्मीचा वास असतो. आपल्याकडे घराची, अंगणाची स्वच्छता केरसुणीने केली जाते. म्हणूनच लक्ष्मीपूजनाला केरसुणीची पूजा केली जाते.
दिवाळीचा एक स्वत:चा असा गंध असतो, जो वातावरणात बर्याच आधीपासून अस्तित्वात असतो. एखाद्या पहाटे उठून जरा बाहेर फेरफटका मारल्यास आपल्याला दिवाळी जवळ आल्याची चाहूल वातावरणातील गंधातून लागते. संदेश येतो. तो फक्त आपल्याला फिल करता आला पाहिजे. त्या हवेचा, वातावरणाचा आल्हाददायक, निरागस, निर्भेळ आनंद आपल्या जिवलगांसोबत वाटून घ्या. मग लक्षात येईल की फक्त आपलीच दिवाळी सुरू होतेय. निसर्गातही दिवाळी सुरू झालेली आहे. रस्तोरस्ती झाडांच्या पायाथ्याशी पानाफुलांच्या रांगोळ्या घातलेल्या असतात. ती त्यांची स्वत:ची अशी लक्ष्मीपूजा असते. हो ना? दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा!