Monday, June 24, 2024
Homeनगरडीजे बंदी ठरावावरून टाकळी ढोकेश्वरमध्ये राडा

डीजे बंदी ठरावावरून टाकळी ढोकेश्वरमध्ये राडा

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

- Advertisement -

तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर (Takli Dhokeshwar) येथे डीजे बंदी ठरावावरून वाद (Dispute) झाल्याने माजी सरपंचासह 11 जणांवर परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. सरपंच अरुणा प्रदीप खिलारी यांच्या फिर्यादीवरून माजी सरपंच शिवाजी खिलारी यांच्यासह इतर नऊ जणांवर शिवीगाळ व धक्काबुक्कीसह विनयभंगाचा (Molestation) गुन्हा दाखल केला आहे. सरपंच अरुणा खिलारी यांनी फिर्यादीत म्हटले, की ग्रामपंचायतने सहा महिन्यांपूर्वी डीजे बंदीचा ठराव केला.

राष्ट्रवादीच्या चार आमदारांविरोधात आक्रमक भूमिका घेणार

शुक्रवारी (दि. 15) सकाळी साडेदहा दरम्यान ग्रामपंचायत कार्यालयात मासिक मिटींग होती. यावेळी ग्रामपंचायत सदस्य शिवाजी सीताराम खिलारी, सुनिता जयसिंग झावरे, सुनील पोपट चव्हाण, सुग्रामी कादर, हवालदार गंगाधर बाळासाहेब निवडुंगे उपस्थित होते. सर्व सदस्य नसल्याने मिटींग रद्द केली. पावणेबाराच्या सुमारास शिवाजी सीताराम खिलारी यांच्यासह दत्ता मारुती झावरे, संकेत अशोक झावरे, विकास भाऊसाहेब वाळूज, ज्ञानदेव भाऊसाहेब पायमोडे, सुरज सुभाष झावरे, गणेश नानासाहेब बांडे, तेजस सतीश बांडे, विनायक महादू झावरे, पवन बाजीराव नरवडे (सर्व रा. टाकळी ढोकेश्वर) व इतर 20 ते 30 जणांसह आले. मला दमदाटी करून तुम्ही डीजे बंदीचा ठराव (DJ Ban Resolution) घेऊन हे पत्र पोलिस स्टेशनला का दिले, असे म्हणत माझ्या अंगावर धावून आले. मला घेराव घालून शिवीगाळ केली. मी घाबरुन खुर्चीवरून उठल्यानंतर शिवाजी खिलारी, विकास वाळूज, दत्ता झावरे यांनी लज्जास्पद वर्तन केले.

झेडपी, पालिका शाळांचे खाजगीकरण; आता शाळाही दत्तक !

माजी सरपंच शिवाजी खिलारी यांच्या फिर्यादीवरून सरपंच अरुणा खिलारी, त्यांचे पती प्रदीप खिलारी, ग्रामपंचायत सदस्य सुनील चव्हाण यांच्या विरुद्ध मारहाण (Beating) व सोन्याची अंगठी चोरीचा गुन्हा दाखल (Filed a Case) केला आहे.

एकीकडे ग्रामपंचायतने डी. जे.बंदीचा ठराव केला असताना विकास कामे करून घेण्याऐवजी डीजे सारख्या वादग्रस्त विषयांवर येऊन राजकीय (Political) आकसापोटी महिला सरपंचाशी वाद घालणे ही बाब अशोभनीय नाही. त्यामुळे टाकळीढोकश्वर ग्रामपंचायतीतील विरोधकांचा कर्ता- धर्ता करविता बोलवता धनी प्रवरेचाच असल्याची टीका (Dispute) निलेश लंके प्रतिष्ठानचे तालुकाअध्यक्ष बाळासाहेब खिलारी यांच्यासह उपसरपंच रामभाऊ तराळ, राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष अंकुश पायमोडे, ओबीसी सेलचे मळिभाऊ रांधवण यांनी केला आहे.

संगमनेर शहरासह ग्रामीण भागात अवैध लॉजिंगला अच्छे दिन

- Advertisment -

ताज्या बातम्या