अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
सहवीज निर्मिती प्रकल्प राबविण्यास प्रशासकीय, तांत्रिक व आर्थिक मान्यता दिलेल्या नगर जिल्ह्यातील
नेवाशातील भेंडा येथील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना, तसेच श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्यास सहवीज निर्मिती प्रकल्पास निधी मंजूर करण्यात आला आहे.
ज्ञानेश्वर साखर कारखान्याला या प्रकल्पासाठी 31.30 लाख तर श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्यास सहवीज निर्मिती प्रकल्पास 53.85 लाख रूपये तसेच सांगलीतील राजारामबापू साखर कारखान्यास 57.85 लाख असे एधूण 143.00 लाख रूपये सहवीज निर्मिती प्रकल्पासाठी शासकीय भागभांडवल मंजूर करण्यात आले आहे.
राज्यातील सहकारी साखर कारखान्यांमार्फत सहवीज निर्मिती प्रकल्प राबविण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. या धोरणानुसार राज्यात सहकारी साखर कारखान्यांच्या माध्यमातून येत्या तीन वर्षात सहवीज निर्मिती प्रकल्पांमधून 1000 मे. वॅट वीज निर्मितीचे उदिष्ट्य ठरविण्यात आले ओह. या धोरणानुसार सहवीज गनिर्मिती प्रकल्प राबविणार्या सहकारी साखर कारखान्यांना प्रकल्प खचर्आच्या 5 टक्के शासकीय भागभांडवल मंजूर करण्यात येत आहे.