Saturday, April 12, 2025
Homeमहाराष्ट्रज्ञानराधा मल्टिस्टेट घोटाळा : चेअरमन सुरेश कुटेसह चौघांना अटक, पाच दिवसांची पोलीस...

ज्ञानराधा मल्टिस्टेट घोटाळा : चेअरमन सुरेश कुटेसह चौघांना अटक, पाच दिवसांची पोलीस कोठडी

अहिल्यानगर (प्रतिनिधी)

बीड येथील ज्ञानराधा मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीचा चेअरमन सुरेश ज्ञानोबा कुटेसह चौघांना अहिल्यानगरच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांना जामखेड पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. दरम्यान, त्यांना शुक्रवारी श्रीगोंदा येथील न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता त्यांना न्यायालयाने पाच दिवसांची (दि. १६) पोलीस कोठडी सुनावली आहे.

- Advertisement -

चेअरमन सुरेश कुटे, व्हा. चेअरमन यशवंत वसंतराव कुलकर्णी, संचालक वैभव यशवंत कुलकर्णी, आशिश पद्माकर पाटोदेकर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. जामखेड मधील ठेवीदारांचे सुमारे ४५ कोटी रूपये अडकले आहेत. याप्रकरणी चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक मंडळासह १९ जणांविरूध्द जामखेड पोलीस ठाण्यात ७ ऑगस्ट २०२४ रोजी गुन्हा दाखल झाला आहे. तसेच श्रीरामपूर येथील ठेवीदारांचेही पैसे ‘ज्ञानराधा’ मध्ये अडकले असून याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात २९ जुलै २०२४ रोजी गुन्हा दाखल झाला आहे. हे दोन्ही गुन्हे तपासकामी येथील आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आली आहेत.

दोन्ही गुन्ह्यांचा तपास गुन्हे शाखेकडून सुरू आहे. चेअरमन सुरेश कुटेसह चौघांना बीड पोलिसांना अटक केली होती. त्यांना मध्यंतरी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ताब्यात घेतले होते. दरम्यान, सध्या ते चौघे बीड पोलिसांच्या ताब्यात होते. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून अहिल्यानगर आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्या चौघांना बीड पोलिसांच्या ताब्यातून घेतले आहे. त्यांना सध्या जामखेड पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. पोलीस उपअधीक्षक गणेश उगले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संतोष शिंदे, पोलीस अंमलदार नियाज शेख, मुकेश शिरसागर, मधुकर चव्हाण यांच्या पथकाने ही कारवाई केली.

श्रीरामपूर, जामखेड ठाण्यांत गुन्हे

बीड येथील ज्ञानराधा मल्टिस्टेट मध्ये बीड, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर येथील ठेवीदारांच्या सुमारे चार हजार कोटींच्या ठेवी अडकल्या आहेत. या मल्टिस्टेटचा चेअरमन सुरेश कुटे याच्यासह संचालक मंडळाविरूध्द बीड, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांत फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान, त्यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड व श्रीरामपूर येथील ठेवीदारांच्या ठेवी दिल्या नसल्याने त्यांच्याविरूध्द गुन्हे दाखल झाले आहेत. जामखेड पोलीस ठाण्यात चेअरमन कुटेसह १९ जणांविरूध्द तर श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात चेअरमन कुटेसह १५ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये अडकले

चेअरमन सुरेश कुटे, त्याची पत्नी संचालक अर्चना कुटे व सर्व संचालक, बँक मॅनेजर व कर्मचारी यांनी ठेवीदारांशी वारंवार संपर्क करून आमची बँक खूप मोठी आहे. इतर बँकेपेक्षा एफडीवर जास्त व्याज दर देत असून तुम्ही फिक्स डिपॉझिट करा असे सांगितले. त्यानुसार सदर संस्थेत ठेवीदारांनी डिपॉझीट केले. तसेच आरडी पुस्तकातही एफडी केले. मात्र ‘ज्ञानराधा’च्या जामखेड व श्रीरामपूर शहर येथील शाखा बंद करण्यात आल्या आहेत. यामुळे शेकडो ठेवीदारांचे कोट्यवधी रूपये अडकून पडले आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Amit Shah : “हात जोडून विनंती करतो, छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्रापुरतं…”;...

0
मुंबई | Mumbai केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या उपस्थितीत किल्ले रायगडावर (Raigad) छत्रपती शिवाजी महाराजांची ३४५ वी पुण्यतिथी व शिवरायांच्या समाधीच्या जिर्णोद्धारास...