Saturday, May 4, 2024
Homeनाशिकजमिनीचे क्षेत्र वाढवून देण्याचा अमिषाला बळी पडू नये : उप वनसंरक्षक चव्हाण

जमिनीचे क्षेत्र वाढवून देण्याचा अमिषाला बळी पडू नये : उप वनसंरक्षक चव्हाण

नाशिक l Nashik

अनुसुचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी यांना जिल्हास्तरीय वनहक्क समितीकडून वन हक्क दावे मंजूर करतांना कोणताही मोबदला घेण्यात येत नसून वन जमिनींचे क्षेत्र देखील वाढवून मिळत नाही.

- Advertisement -

त्यामुळे वन हक्क दावेधारकांनी जमिनींचे क्षेत्र वाढवून देण्याच्या अमिषाला बळी पडू नये, असे नाशिक पूर्व भागाचे उप वनसंरक्षक तुषार चव्हाण यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमुद केल्यानुसार, केंद्र सरकारच्या अनुसुचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी अधिनियम व 18 मे 2020 रोजीच्या अधिसुचनेनुसार जिल्हास्तरीय वनहक्क समितीकडून वनहक्क दावे मंजुर करण्यात येतात.

ही दावे मंजुर करण्याची प्रक्रीया पारदर्शक व विनामुल्य करण्यात येत असते. यासाठी समितीकडून वन हक्क दावे मंजूर करतांना कोणताही मोबदला घेतला जात नसून वन जमिनींचे क्षेत्र देखील वाढवून मिळत नाही.

वनहक्क जमिन क्षेत्र वाढवून देण्याचे अमिष दाखवून त्या मोबदल्यात रक्कमेची मागणी करणाऱ्या संघटना, मध्यस्थी, दलाल तसेच त्रयस्थ व्यक्तींबाबत त्वरीत शासकीय यंत्रणा तसेच पोलिसांना कळविण्यात यावे, असेही उप वनसंरक्षक चव्हाण यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या