Sunday, September 15, 2024
Homeनगरडॉ. निलेश शेळकेसह सात जणांविरूद्ध फसवणूकीचा गुन्हा

डॉ. निलेश शेळकेसह सात जणांविरूद्ध फसवणूकीचा गुन्हा

अहमदनगर|प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

नगर अर्बन बँकेच्या केडगाव व मार्केट यार्ड  शाखांमधील कर्ज प्रकरणात 22 कोटी 90 लाखाच्या रकमेचा अपहार झाला आहे.

याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात सात जणांविरूद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यामध्ये डॉ. निलेश विश्‍वासराव शेळके, डॉ. विनोद आण्णासाहेब श्रीखंडे, डॉ. रवींद्र दौलतराव कवडे, डॉ. भास्कर रखमाजी सिनारे, गिरीश ओम प्रकाश आग्रवाल, निर्मल एजन्सी, अहमदनगर आणि स्पंदन मेडिकेयर, पुणे यांचा समावेश आहे. बॅकेचे व्यवस्थापक महादेव पंढरीनाथ साळवे (रा. सावेडी) यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत साळवे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, हॉस्पिटलमधील मशिनरी खरेदी करण्यासाठी आरोपी यांनी बँकेच्या केडगाव व मार्केट यार्ड शाखेत कर्जप्रकरण दाखल केले होते. यासाठी आरोपी हे एकमेकांचे जामीनदार राहिले.

तसेच डॉ. कवडे यांना गिरीश आग्रवाल हे जामीनदार राहून सदरील कर्जाच्या रक्कमेतून हॉस्पिटलसाठी कोणत्याही प्रकारची मशिनरी खरेदी न करता निर्मल एजन्सी, नगर व स्पंदन मेडिकेयर, पुणे यांच्याबरोबर संगनमत करून त्यांच्या खात्यावर पैसे वर्ग केले.

यानंतर सौ. रोहिणी सिनारे आणि उज्वला कवडे यांच्या वयक्तीक बँक खात्यावर कर्जाची रक्कम ट्रान्सफर करून कर्ज रक्कमेत गैरव्यवहार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सदर कर्जाच्या रकमेतून मशिनरी न घेता परस्पर कर्जाची रक्कम कर्जदार व जामीनदार यांनी संगमनताने वैयक्तिक फायद्यासाठी वापरून बँकेच्या कर्जाच्या रकमेचा अपहार केला.

यामुळे सात जणांविरूद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन करीत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या