Friday, May 3, 2024
Homeनाशिकप्रा.बाळासाहेब तांबे यांना विद्यावाचस्पती पदवी

प्रा.बाळासाहेब तांबे यांना विद्यावाचस्पती पदवी

नाशिक । प्रतिनिधी

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या केटीएचएम महाविद्यालयातील भूगोल विभागात सहाय्यक प्राध्यापक पदावर कार्यरत असलेले बाळासाहेब तांबे यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने ‘इम्पॅक्ट ऑफ ऑफ ऑर्बनायझेशन ऑन हायड्रोजिओमार्फोलॉजी ऑन अर्बन स्ट्रीम फ्लोइंग थ्रु नासिक अर्बन एग्लोमरेशन, महाराष्ट्र’ या विषयासाठी विद्यावाचस्पती ही पदवी बहाल करुन गौरविण्यात आले.

- Advertisement -

तांबे यांना विदर्भ शासकीय महाविद्यालय अमरावती येथील प्राध्यापक डॉ. प्रशांत पी. मगर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच शहादा कॉलेज चे प्राध्यापक डॉ. उत्तम निळे यांनी बाह्य परीक्षक म्हणून काम पाहिले.

जानेवारी 2014 पासून नाशिक शहरातील गोदावरी नदीवरील हे काम सुरू होते. अंतिम सादरीकरणाच्या चार दिवस आगोदर प्राध्यापक तांबे यांना करोनाची लागण झाली असतांना सिन्नर कोविड केअर सेंटर येथून आपल्या संशोधनाचे ऑनलाइन सादरीकरण केले व प्रबळ इच्छाशक्ती असेल तर जगातील कोणतेही संकट हे आपल्याला आपल्या ध्येयापासून रोखू शकत नाही हा संदेश दिला.

त्यांच्या या यशाबद्दल संस्थेच्या सरचिटणीस निलीमाताई पवार,अध्यक्ष डॉ.तुषार शेवाळे,सभापती माणिकराव बोरस्ते,उपसभापती राघोनाना आहिरे,चिटणीस डॉ.सुनील ढिकले यांनी अभिनंदन केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या