Thursday, May 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजPhaltan Doctor Suicide: डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील PSI बदनेचे अनेक कारनामे उघड; अन्य...

Phaltan Doctor Suicide: डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील PSI बदनेचे अनेक कारनामे उघड; अन्य महिलांशीही ही करायचा छेडछाड, पैसे मागायचा

सातारा | Satara
सातारा जिल्ह्यातील फलटणमधील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका महिला डॉक्टरने एका हॉटेलमध्ये आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली असून राज्यभर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या मृत महिला डॉक्टरने आत्महत्येपूर्वी स्वत:च्या तळहातावर सुसाइड नोट लिहिली होती. त्यामध्ये दोन जणांवर मानसिक छळाचे गंभीर आरोप केलेले आहेत.

या प्रकरणातील आरोपींमध्ये एका पोलीस उपनिरीक्षकासह आणखी एकाचा सहभाग असून ही घटना घडल्यानंतर आरोपी फरार झाले होते. त्यांच्या शोधासाठी पोलिसांची दोन पथके रवाना करण्यात आले होते. दरम्यान, आता या प्रकरणात सातारा पोलिसांनी मोठी कारवाई केली असून या प्रकरणातील एक आरोपी प्रशांत बनकर याला आज पहाटे पुण्यातून अटक करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. तर या घटनेतील मुख्य आरोपी असलेला पीएसआय गोपाळ बदने हा अद्यापही फरार आहे. त्याचे शेवटचे लोकेशन पोलिसांना सापडले असल्याचे समजत आहे.

- Advertisement -

दरम्यान, याच PSI बदनेबद्दल अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहे. त्याने केवळ महिला डॉक्टरच नव्हे तर इतर महिलांना देखील त्रास दिल्याचे समोर आले आहे. तो अनेकदा महिलांचा छेड काढायचा, त्यांना डोळा मारायचा अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

महिलांची छेड काढायचा
फलटण उपजिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांकडून बदने याच्याविषयी अनेक तक्रारी केल्या गेल्या आहेत. काही महिलांनी थेट माध्यमांसमोर येऊन सांगितले की, बदने हा महिलांची छेड काढायचा, डोळा मारायचा आणि तक्रार केली तर उलट पैसे मागायचा. एका महिलेने आरोप केला की तिच्या भाचीने तक्रार द्यायला गेल्यावर बदनेने तिच्याच नवऱ्यासमोर तिला डोळा मारला आणि पाच हजार रुपये मागितले. पैसे दिले नाहीत म्हणून त्याने तक्रारच घेतली नाही. या महिला साक्षींमुळे प्रकरण आणखी गंभीर वळण घेत आहे. बदनेचा महिलांशी असलेला वर्तनाचा हा इतिहास आता उघडकीस येत असून, पोलिस विभागावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.”

गोपाळ बदनेचे शेवटचे लोकेशन सापडले
फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी गोपाळ बदने याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. मूळचा बीड जिल्ह्यातील परळीचा असलेला गोपाळ बदने कालपासून फरार आहे. पोलिसांची पथक त्याच्या शोधासाठी रवाना झाली आहेत. दरम्यान आरोपी गोपाळ बदनेचे शेवटचे लोकेशन पंढरपूर भागात सापडल्याने पोलीस यंत्रणा अलर्ट झाली आहे. पंढरपूर आणि बीड भागात आरोपीचा शोध घेतला जातोय.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई | वृत्तसंस्था Mumbai भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील संबंध अधिक बळकट करण्यासाठी महाराष्ट्र विश्वासार्ह भागीदार म्हणून कार्य करण्यास सज्ज आहे. व्हिएतनाम सोबत सांस्कृतिक, आर्थिक आणि...