Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रकरोनाची लस घेतल्यानंतर डॉक्टरची करोना टेस्ट पॉझिटिव्ह

करोनाची लस घेतल्यानंतर डॉक्टरची करोना टेस्ट पॉझिटिव्ह

पुणे –

करोनाची लस पहिल्या टप्प्यात सर्वात अगोदर डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात येत आहे. हे लसीकरण सुरू असताना पुण्यात

- Advertisement -

एक आश्चर्यकारक प्रकार समोर आला आहे. ससून रुग्णालयातील एका निवासी डॉक्टरला लस दिल्यानंतर या डॉक्टरची करोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.

करोनाग्रस्त रुग्णांशी थेट संबंध येत असल्याने पहिल्यांदा डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जात आहे. पुण्यातील ससून रुग्णालयातही लसीकरण सुरू आहे. या लसीकरण मोहिमेमध्ये गेल्या आठवड्यात या निवासी डॉक्टरला लस देण्यात आली होती. लसीकरण करण्यापूर्वी या डॉक्टरला कोरोनाची कुठलीही लक्षणे दिसून येत नव्हती.

त्यामुळे या डॉक्टरला आठ दिवसांपूर्वी लस देण्यात आली खरी परंतु काही दिवसांनंतर या डॉक्टरला अंगदुखी, सर्दी, खोकला असि लक्षणे दिसून आल्याने त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली . त्यामध्ये ते कोरोना पॉसिटीव्ह असल्याचे निदर्शनास आले.

दरम्यान, हे डॉक्टर लस घेण्यापूर्वी बाहेर गावी प्रवास कारूयान आले असल्याची माहिती मिळाली. त्यांना त्यावेळी कुठलीही लक्षणे न दिसल्याने त्यानं लस देण्यात आली. मात्र, लासिकरणा अगोदरच त्यांना कोविड-19 विषाणूचा संसर्ग झाला असल्याचे आणि म्हणून त्यांची लक्षणे नंतर दिसून येत असल्याची शक्यता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. या डॉक्टरांवर सध्या उपचार सुरू आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या