Wednesday, April 9, 2025
Homeदेश विदेशDominican Republic Roof Collapse : नाइटक्लबचे छत कोसळून ९० हून अधिक जणांचा...

Dominican Republic Roof Collapse : नाइटक्लबचे छत कोसळून ९० हून अधिक जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

डोमिनिकन गणराज्याची (Dominican Republic ) राजधानी सँटो डोमिंगोत मंगळवार (दि.०८) रोजी एका नाइटक्लबचा स्लॅब अचानक कोसळल्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत ९० हून अधिक लोकांचा मृत्यू (Death) झाल्याची माहिती समोर आली आहे. तर १६० लोक जखमी झाले असून ढिगाऱ्याखाली अनेक लोक दबले गेल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांत मोंटेक्रिस्टीच्या गव्हर्नर नेल्सी क्रूज यांचाही समावेश आहे. मेरेंग्यू गायिका रुबी पेरेज यांचे गायन सुरू असतानाच छत (Roof) अचानक कोसळले. असे काही होईल याचा काहीही अंदाज लोकांना (People) नव्हता. सगळेच अचानक घडल्याने कुणालाही पळून जाता आले नाही. या घटनेत पेरेज संगीत समुहातील वादकाचाही मृत्यू झाल्याचे समजते.

तसेच दुर्घटना घडल्यानंतर तब्बल १२ तासांपासून बचाव कार्य सुरु आहे. अग्निशमन दलाचे (Fire Fighters) जवानही बचाव कार्यात सामील झाले आहेत. नाईट क्लबमधील ढिगारा उचलण्यासाठी लाकडी तुकड्याचा वापर केला जात आहे. तर सिमेंटच्या भिंती तोडण्यासाठी ड्रिलिंगचा वापर केला जात आहे.

दरम्यान, या घटनेवर राष्ट्रपती लुइस अबिनाडर (President Luis Abinador) यांनी एक्सवर पोस्ट लिहित दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी म्हटले की, घटना घडल्यानंतर आम्ही क्षणाक्षणाची माहिती घेत आहोत. यानंतर राष्ट्रपती अबिनाडर स्वतः घटनास्थळी दाखल झाले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना शोधण्यासाठी आलेल्या लोकांचे त्यांनी सांत्वन केले. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलणे मात्र टाळल्याचे दिसून आले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Maharashtra Politics : “…तर थेट मंत्रिपद”; राष्ट्रवादीच्या बैठकीत कृषिमंत्री कोकाटेंना अजित...

0
मुंबई | Mumbai राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) हे त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे काहीसे अडचणीत आले आहेत. त्यांनी महिनाभरापूर्वी अमरावती दौऱ्यावर (Amravati Visit) असताना शेतकऱ्यांबाबत...