Saturday, November 9, 2024
Homeधुळेमुलीला पळवून नेणार्‍यास गुजरातमधून अटक

मुलीला पळवून नेणार्‍यास गुजरातमधून अटक

दोंडाईचा – Dondaicha – श.प्र :

येथून अल्पवयीन मुलीला पळवुन नेणार्‍या संशयिताला दोंडाईचा पोलिसांनी गुजरात राज्यातून अटक केली आहे. तसेच मुलीलाही ताब्यात घेतले आहे.

- Advertisement -

शहरातून एका अल्पवयीन मुलीला जगदीश उर्फ विकी दिलीप बोरसे (रा. दोंडाईचा) याने पळवून नेले होते. याप्रकरणी दोंडाईचा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक पंजाबराव राठोड यांनी उपनिरीक्षक देविदास पाटील यांच्यासह पथकाला तपासाचे आदेश दिले.

त्यानुसार पथक गुजरात राज्यात रवाना झाले होते. दोन दिवसात अल्पवयीन मुलगी व संशयितला गुजरात राज्यातील सुरत येथून ताब्यात घेण्यात आले.

मुलीला कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले. मुलीचा जबाब नोंदवून गुन्ह्यात संशयीत आरोपीविरूध्द भादवि कलम 366 (अ), 376 (अ) (एम), बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा 2012 चे कलम 3 प्रमाणे व 5 (एल) चे उल्लंघन 6 प्रमाणे वाढीव कमल लावण्यात आले आहे.

संशयीत जगदीश उर्फ विकी दिलीप बोरसे याला अटक करण्यात आली आहे. तसेच दोंडाईचा पोलिसात दाखल एका गुन्ह्याचील मोबाइल देखील सुरत येथून हस्तगत करण्यात आला आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, शिरपूर उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल माने, गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंजाबराव राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक देविदास पाटील, पोकाँ योगेश पाटील, हेकाँ संजय पाटील यांनी केली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या