दोंडाईचा । शहर प्रतिनिधी Dondaicha
शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा शहरातही करोना विषाणुने हात पाय पसरविणे सुरू ठेवले आहे. करोनाचा दिवसेंदिवस वाढता संसर्ग विचारात घेता ही साखळी खंडित करण्यासाठी प्रशासनाने पाच दिवस जनता कर्फ्यु जारी केला आहे.
- Advertisement -
यास शहरातील नागरिकांनसह व्यापाऱ्यांनीही चांगला प्रतिसाद दिल्याने आज पहिल्याच दिवशी शहरात सर्वत्र सन्नाटा पाहण्यास मिळाला.
नागरिकांनी नियमांचे पालन करावे, शक्य असल्यास कामाशिवाय घराबाहेर पडू नये, नियमित तोंडाला मास्क लावला असे आवाहन प्रशासना द्वारे केले गेले आहे.
(व्हिडिओ/फोटो : समाधान ठाकरे)